हैदराबाद- मल्याळम अभिनेत्री अमला पॉल हिचा लेटेस्ट व्हिडिओ व्हायरल झाला आहे. होळीच्या निमित्ताने तिने हा व्हिडिओ चाहत्यांसाठी पोस्ट केला आहे. आज होली पोर्णिमेनिमित्य असलेला पूर्ण चंद्र आणि होळीच्या शुभेच्छा तिने दिल्या आहेत.
अभिनेत्री अमला पॉलने होळीच्या निमित्ताने आपल्या चाहत्यांसाठी एक दीर्घ पोस्ट लिहिली आहे. तिने एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती एका दाक्षिणात्य गाण्यावर धमाल थिरकताना दिसत आहे. तिने आपल्या पोस्टला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'पौर्णिमा आणि होळीच्या परिवारालाहार्दिक शुभेच्छा !!!आज कन्या राशीतील पौर्णिमेला, आपल्याला परिपूर्णतावादाच्या सभोवतालच्या सावल्या उलगडण्याची, पुरेसे चांगले वाटण्याची आणि प्रत्येक क्षणी आपण जसे आहोत तसे स्वीकारण्याची संधी आहे!! कन्या राशीतील या पौर्णिमेला तुम्हाला बरे वाटण्यास मदत होऊ द्या. हे तुमच्या स्वप्नांसाठी पुरेसे चांगले. तुमची प्रतिभा शेअ करण्यासाठी आणि आपल्या तेजात उभे राहण्यासाठी पुरेसे चांगले आहे. आपण कोण आहात हे परिभाषित करणारे सर्वकाही गमवा, फक्त पुरेसे चांगले असलेल्या सर्व गोष्टी सोडून द्या आणि तुमच्या महानतेत पाऊल टाकत रहा. एका फॉर्ममधून दुसऱ्यात सहज विसर्जित होणे ही किमया आहे. हे माझे आवडते बालपणीचे गाणे आहे, ज्यावर मी प्रेम करते.', असे तिने लिहिलंय.