महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Actress Alia Bhatt Buys New House : आलियाने खरेदी केले नवीन घर, किंमत ऐकूण बसेल धक्का - आलिया भट्ट नवीन घर

अभिनेत्री आलिया भट्टने मुंबईत नवीन घर खरेदी केले आहे. त्यासह आलियाने तिच्या बहिणीलाही दोन फ्लॅट गिफ्ट दिल्याचे पुढे आले आहे.

Actress Alia Bhatt Buys New House
अभिनेत्री आलिया भट्टचे संग्रहित छायाचित्र

By

Published : Apr 25, 2023, 8:17 AM IST

मुंबई : चित्रपटसृष्टीतील सुंदर, आणि अष्टपैलू अभिनेत्री आलिया भट्ट आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आलियाने रणबीर कपूरसोबत लग्न केल्यानंतर तिच्या आयुष्यात अनेक सुखद घटना घडत आहेत. आलिया आणि रणबीर यांना एक कन्याही झाली आहे. त्यामुळे आलियाच्या जीवनात सध्या आनंदोत्सव सुरू आहे. त्यातच आलियाने मायानगरीत आलिशान घर खरेदी केल्याचे स्पष्ट झाले आहे. आलियाच्या या घराची किंमत वाचून मात्र तुम्हाला धक्काच बसणार आहे. त्यासह आलियाने आपल्या बहिणीलाही दोन फ्लॅट घेऊन दिल्याची चर्चा आहे.

एप्रिल महिन्यात आलियाने केली प्रॉपर्टीत गुंतवणूक :आलिया भट्टने अलीकडेच तिच्या प्रॉडक्शन हाऊसद्वारे मोठी रक्कम गुंतवली आहे. आलियाने एप्रिल महिन्यात प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली असून वांद्रे येथे अनेक घरे खरेदी केली आहेत. आलियाने घेतलेला पहिला फ्लॅट 2 हजार 497 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे. आलियाने वांद्रे पश्चिम येथील तिच्या प्रॉडक्शन हाऊसने खरेदी केलेल्या अपार्टमेंटसाठी 37.80 कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे आलियाचा नवीन पत्ता आता पाली हिल येथील एरियल व्ह्यू कोऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेडचा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आलियाने बहिणीला दिले फ्लॅट :आलियाने 2.26 कोटी रुपयांचे घर खरेदीसाठी मुद्रांक शुल्क देखील भरले आहे. आलियाने खरेदी केलेल्या या घराचा 10 एप्रिल 2023 रोजी विक्री करार नोंदणीकृत झाला आहे. याशिवाय आलियाने तिची बहीण शाहीन भट्ट हिला 7.68 कोटी रुपयांचे दोन अपार्टमेंटही गिफ्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आलियाच्या बहिणीचा फ्लॅट जुहूच्या गीगी अपार्टमेंटमध्ये आहे. दरम्यान, वर्क फ्रंटबाबत बोलायचे झाल्यास आलिया लवकरच रॉकी आणि राणीच्या प्रेमकथेमध्ये रणवीर सिंगच्या बरोबर दिसणार आहे. करण जोहर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. आलिया रणवीरसोबतच या चित्रपटात धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन यांच्याही भूमिका आहेत. यासोबतच आलियाकडे प्रियांका चोप्रा आणि कतरिना कैफसोबत जी ले जरा हा चित्रपट देखील आहे.

हेही वाचा - Kedarnath Dham Door Open : बाबा केदारनाथांचे दरवाजे उघडल्याने भाविकांना घेता येणार दर्शन; चारधाम यात्रेचा झाला प्रारंभ

ABOUT THE AUTHOR

...view details