महाराष्ट्र

maharashtra

Upendra Limayes new movie : प्रसिद्ध अभिनेते उपेंद्र लिमये म्हणताहेत 'फेमस होणारच'!

राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता उपेंद्र लिमये यांचा नवा चित्रपट 'फेमस होणारच' रिलीजच्या मार्गावर आहे. आजवर अनेक प्रकारच्या भूमिका हाताळलेल्या उपेंद्रच्या चाहत्यांसाठी यावेळी तो आणखी एक खास व्यक्तीरेखा साकारतोय.

By

Published : May 13, 2023, 5:39 PM IST

Published : May 13, 2023, 5:39 PM IST

Etv Bharat
अभिनेते उपेंद्र लिमये

मुंबई- चित्रपटांमधील अभिनयासाठी शारीरिक ठेवण आणि आवाज या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. फारच कमी कलाकार आहेत ज्यांच्यात या दोन्ही गोष्टी उपजत आहेत. काही कलाकार फक्त शारीरिकरित्या उत्तम असतात तर काही संवादफेकीसाठी प्रसिद्ध असतात. परंतु या दोन्हींचा मेळ असलेला एक कलाकार म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता उपेंद्र लिमये. उपेंद्र लिमये यांनी भारदस्त व्यक्तिमत्त्व असलेले अनेक चित्रपट केले आहेत. त्यांच्या आवाजाची जातकुळी दृष्ट लागण्यासारखी आहे. प्रसिद्ध अभिनेते उपेंद्र लिमये आता म्हणताहेत 'फेमस होणारच'. ते फेमस आहेतच हो, परंतु 'फेमस होणारच' हे त्यांच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे.

'फेमस होणारच' या चित्रपटातून उपेंद्र लिमये यांचं रांगडं व्यक्तिमत्व आणि खर्जातील बोलणं पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. उपेंद्र लिमये यांनी आपले व्यक्तिमत्व आणि कसदार अभिनय याच्या जोरावर सिनेसृष्टीत आपले स्थान टिकवून ठेवले आहे. या सिनेविश्वात दररोज नवनवीन कलाकारांचा भरणा होत असतो. प्रेक्षक आणि निर्माते तरुण कलाकारांना झुकतं माप देताना दिसतात. परंतु उपेंद्र लिमये सारख्या कलाकारांमुळे चित्रपटांची उंची वाढत असते. हेच उपेंद्र लिमये पुन्हा एकदा सिद्ध करण्यासाठी सरसावले असून 'फेमस होणारच' या ॲक्शनपटातून ते प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या चित्रपटात उपेंद्र लिमये प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

'फेमस होणारच'मधून अक्षय नागनाथ गवसाने दिग्दर्शनात पदार्पण करीत आहे. त्यांनीच या चित्रपटाची निर्मितीसुद्धा केली आहे. 'फेमस होणारच'मधून फेमस होण्यासाठी उपेंद्र लिमये यांना साथ देणार आहेत महेश गायकवाड, अक्षया हिंदळकर, पूजा राजपूत, तेजस्विनी सुनील, प्रदीप शिंदे, प्रेम धर्माधिकारी, विजय निकम, अक्षय अशोक म्हस्के हे कलाकार.

'फेमस होणारच' हा चित्रपट 'गवसाने प्रॉडक्शन हाऊस' आणि 'गायकवाड सन्स प्रॉडक्शन हाऊस' ची प्रस्तुती असून 'ए. जी प्रॉडक्शन हाऊस'च्या बॅनरखाली याची निर्मिती झाली आहे. ॲक्शन आणि रोमान्स ने भरपूर असलेल्या या चित्रपटाचे निर्माते आहेत मनोज गवळी, आशिष गुंजेकर, अंकित बजाज, अक्षय नागनाथ गवसाने. उपेन्द्र लिमये यांची प्रमुख भूमिका असलेला 'फेमस होणारच' हा रोमँटिक ॲक्शनपट लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

हेही वाचा -Exclusive Interview : सोनाक्षी सिन्हा म्हणते, 'मेकअप शिवाय काम करताना जराही भीती वाटली नाही!'

ABOUT THE AUTHOR

...view details