मुंबई : गेली ३० वर्षे दूरचित्रवाणी आणि चित्रपट क्षेत्रात कार्यरत असलेले प्रसिद्ध अभिनेते शाहनवाज प्रधान यांचे शुक्रवारी निधन झाले. ते 56 वर्षांचे होते. मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे सिनेजगतात शोककळा पसरली आहे.
मिर्झापूर मध्ये पोलिसाची भूमिका गाजली : शाहनवाज प्रधान यांनी श्री कृष्णा आणि अलिफ लैला या लोकप्रिय मालिकांसह अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मिर्झापूर या लोकप्रिय वेब सिरीजमध्ये त्यांनी पोलिसाची तर फँटम चित्रपटात त्यांनी हाफिज सईदची भूमिका साकारली आहे. याशिवाय त्यांनी अनेक वेब सीरीज आणि टीव्ही मालिका मध्येही महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत.
शाहनवाज प्रधान यांचे जीवन : शाहनवाज प्रधान यांचे शिक्षण छत्तीसगडच्या रायपूर येथे झाले. शालेय जीवनापासून ते वार्षिक समारंभात नाटके सादर करायचे. त्यानंतर त्यांनी रायपूरमधील एका थिएटर ग्रुपमध्ये सहभागी होऊन अभिनयाच्या जगात प्रवेश केला. प्रधान यांनी आनंद वर्मा, मिर्झा मसूद जलील रिझवी आणि हबीब तन्वीर यांसारख्या गुरूंच्या उपस्थितीत अभिनयाचे बारकावे शिकून घेतले. 1984 मध्ये एका कार्यशाळेदरम्यान, ते हबीब तन्वीर यांच्यासोबत त्यांच्या व्यावसायिक गट नया थिएटरमध्ये सामील झाले. तेव्हापासून त्यांनी दिल्ली, मुंबई आणि इतर मोठ्या शहरांमध्ये नाटके सादर करण्यास सुरुवात केली. शाहनवाज प्रधान 1991 मध्ये मुंबईला गेले आणि तेथे त्यांनी टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये प्रवेश केला.
कार्यक्रमादरम्यान हार्ट अटॅक आला : अभिनेता यशपाल शर्माने सोशल मीडियावर पोस्ट लिहून शाहनवाज प्रधान यांना श्रद्धांजली वाहिली आहे. शर्मा यांनी लिहिले की, 'मुंबईतील या कार्यक्रमाला मी हजेरी लावली होती. रिझ डायम डॅरेल्सचा कार्यक्रम खूप छान चालला होता. शेकडो कलाकार तिथे उपस्थित होते. पण पुरस्कार मिळाल्यानंतर काही वेळाने आमचा आवडता कलाकार शाहनवाजला हॉर्ट अटॅक आला. त्यामुळे कार्यक्रम थांबवण्यात आला. त्यानंतर लोकांच्या मदतीने त्यांना त्वरीत कोकिला बेन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र तेथे त्यांना वाचवता आले नाही.
हेही वाचा :Actress Swara Bhaskar Married : अभिनेत्री स्वरा भास्करने राजकारणी फहाद अहमदशी केले लग्न; ट्विटद्वारे दिली माहिती