प्रयागराज :उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील कटरा भागात एका हिंदी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान स्कूटरवरून जात असलेला अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav) याने त्याला धडक दिल्याने एक विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेसंदर्भात विद्यार्थ्याने कर्नलगंज पोलिसांकडे तक्रार दिली असून चित्रपटाच्या टीमने गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. (rajpal yadav accidently hits student, rajpal yadav film shoot in praygraj)
Rajpal Yadav : अभिनेता राजपाल यादवचे स्कूटर चालवताना सुटले नियंत्रण, विद्यार्थ्याला दिली धडक - अभिनेत्याचे नियंत्रण सुटले
राजपाल यादव जी स्कूटर चालवत होता ती जुनी असल्याचे पोलिसांनी सांगितले. क्लच वायर तुटल्याने अभिनेत्याचे नियंत्रण सुटले आणि विद्यार्थ्याला धडकली. यात विद्यार्थ्याला कोणतीही दुखापत झाली नसून, याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. (rajpal yadav accidently hits student, rajpal yadav film shoot in praygraj)
अभिनेत्याचे नियंत्रण सुटले : जिल्हा प्रशासनाच्या परवानगीने सुरू असलेल्या शूटिंगमध्ये विद्यार्थ्यासह काही लोकांनी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत अभिनेत्याने पोलिसांकडे तक्रारही केली आहे. कर्नलगंज पोलिस स्टेशनचे स्टेशन हाऊस ऑफिसर राम मोहन राय यांनी सांगितले की, अभिनेता जी स्कूटर चालवत होता ती जुनी होती. क्लच वायर तुटल्याने अभिनेत्याचे नियंत्रण सुटले आणि विद्यार्थ्याला धडकली, असेही ते म्हणाले.
विद्यार्थ्यांसह उत्सुक स्थानिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली :पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, विद्यार्थ्याला कोणतीही दृश्यमान जखम झाली नाही. मात्र, पुढील तपास सुरू असून पुढील कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले. एका वृत्तानुसार, कॉमेडियन राजपाल यादव आणि त्याच्या टीमने सकाळी लक्ष्मी टॉकीज क्रॉसिंगजवळ त्यांच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरू केले. शूटिंग पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसह उत्सुक स्थानिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर टीम बँक रोडकडे निघाली जिथे यादव स्कूटरवरून चित्रित होत होते.