मुंबई : अभिनेता आदित्य सिंग राजपूत 22 मे रोजी दुपारी त्याच्या राहत्या घरात बाथरुममध्ये मृतावस्थेत आढळून आला. त्यानंतर आदित्यच्या अचानक जाण्याने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला. शिवाय आदित्य सिंह राजपूतचे अकाली निधन झाल्याने बॉलिवूड आणि टीव्ही जगतावर शोककळा पसरली आहे. वयाच्या 32व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला आहे. आदित्य हा मुंबईतील एक प्रसिद्ध अभिनेता, मॉडेल आणि कास्टिंग कोऑर्डिनेटर होता. आदित्याने बॉलिवूडमध्ये आणि अनेक ब्रँडच्या जाहिरातमध्ये काम केले होते. अंधेरीमध्ये सोमवारी त्याचा 11व्या मजल्यावरील उंच इमारतीच्या बाथरुममध्ये मृतावस्थेत शव आढळला.
मृत्यूबद्दल अनेक तर्कवितर्क : तसेच या अभिनेत्याच्या मृत्यूबद्दल अनेक तर्कवितर्क लढविण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांकडून माहिती मिळाली आहे की, आदित्य मृत्यू हा बाथरूममध्ये घसरून पडल्याने झाला असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. तर दुसरीकडे, पोलीसकडून असे सांगण्यात आले की, आदित्यच्या कानाच्या वर कापल्याच्या दोन जखमा आणि डोक्याला मार लागला आहे, ज्यामुळे तो पडण्याची शक्यता आहे. आदित्याची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती ठीक नव्हती, असे पोलिसांनी सांगण्यात आले आहे. मोलकरणीने पोलिसांना सांगितले की अभिनेत्याला खोकला, सर्दी आणि उलट्या होत होत्या, तसेच या रविवारी आदित्यने पार्टी केली होती.
मोलकरणी आपल्या जबानीत काय म्हटले? : मोलकरणीच्या म्हणण्यानुसार, सोमवारी आदित्य हा सकाळी 11 वाजता उठला आणि त्याने नाश्त्यामध्ये पराठा खाल्ला पण त्यानंतर त्याला सतत उलट्या होऊ लागल्या, त्यानंतर त्याने स्वयंपाकाला खिचडी बनवायला सांगितली. दुपारी 2 ते 2.30 च्या दरम्यान आदित्य हा बाथरूममध्ये गेला. त्यांच्या घरातील नोकराला त्याचा जोरात पडल्याचा आवाज आला आणि त्याने धाव घेतली तेव्हा आदित्य जमिनीवर पडला होता आणि त्याला किरकोळ दुखापतही झाली होती.