मुंबई -सुदीप्तो सेन दिग्दर्शित द केरळ स्टोरी सध्या थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यावर या चित्रपटाविषयी वाद सुरूच आहे. अनेक राजकीय नेत्यानी या चित्रपटाला समर्थन दिले आहे तर काहीजणांनी या चित्रपटाला प्रोपगंडा म्हणत त्याच्यावर टिका केली आहे. एकीकडे भारतात अनेक राज्यात चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाला इतर देशांमध्येही प्रदर्शित करण्याचे ठरविले आहे. आता हा चित्रपट 37 देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अदा शर्मानं याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने प्रेक्षकांना धन्यवाद म्हटले आहे. पुढे तिने लिहले की, 'आमचा चित्रपट पाहिल्याबद्दल धन्यवाद, तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार आणि ट्रेंड केल्याबद्दल धन्यवाद. माझ्या अभिनयावर प्रेम केल्याबद्दल धन्यवाद. त्यानंतर तिने सांगतले की, या आठवड्याच्या शेवटी १२ मे रोजी द केरळ स्टोरी चित्रपट ३७ देशांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
द केरळ स्टोरी : अदाला एका मुलाखतीमध्ये विचारले गेले की, देशाच्या राजकीय परिस्थितीमध्ये कोणत्या संख्येमुळे व्यत्यय निर्माण झाला. यावर उत्तर देताना ती म्हणाली, 'कथा खरोखरच भयानक आहे. लोक याला अपप्रचार म्हणत आहेत. हरवलेल्या मुलींच्या संख्येबद्दल विचार केला पाहिजे. वस्तुस्थिती भयावह आहे. चित्रपटाच्या विषयाबद्दल आत्मविश्वास व्यक्त करताना, ती म्हटले की, एकदा चित्रपट पाहिल्यावर तुम्ही आकड्यांवर चर्चा करणार नाही.' अदाने २००८ मध्ये तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर, तिने हसी तो फसी, कमांडो 2 आणि कमांडो 3 सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. दरम्यान, पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारने शांतता राखण्यासाठी या चित्रपटावर बंदी घातली आहे.