मुंबई : या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त करताना त्याने लिहिले, की व्वा, मला आठवते की काही वर्षांपूर्वी मी हिमाचलमध्ये होतो. मी त्यावेळी खूप लहान होतो. त्यावेळी मी दर महिन्याला स्टारडस्ट मासिक विकत घेत असे, कारण ते आमचे बॉलीवूडचे प्रवेशद्वार होते. या प्रतिष्ठित मासिकाच्या मुखपृष्ठावर कोणता अभिनेता येणार आहे याची मी वाट पाहत होतो. मी स्टारडस्टची 50 वर्षे साजरी करण्यासाठी उपस्थित होतो, हे विशेष होते. मात्र, उद्याचा उदयोन्मुख सुपरस्टारने मला सन्मानित केल्यामुळे ही रात्र माझ्यासाठी आणखी खास बनली आहे असही तो म्हणाला आहे. नुकत्याच झालेल्या स्टारडस्ट अवॉर्ड्समध्ये आयुष शर्माला 'रायझिंग सुपरस्टार ऑफ टुमारो' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शनिवार (दि. 28 जानेवारी)रोजी रात्री बॉलिवूडने आयकॉनिक मॅगझिनची ५० वर्षे साजरी केली.
सगळेच त्याचे अभिनंदन करत आहेत : मी यासाठी पात्र आहे की नाही हे माहित नाही. परंतु, हे यश माझ्यासाठी हे खूप लवकर मिळालेले आहे. माझ्यासारख्या तरुण अभिनेत्याला हे जेतेपद मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल मी स्टारडस्टचे आभार मानू इच्छितो. माझ्यासाठी हा पुरस्कार एक ध्येय आहे ज्यासाठी मी दररोज प्रयत्न करेन. या सन्मानासाठी स्टारडस्टचे खूप खूप आभार. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळेच त्याचे अभिनंदन करत आहेत.