मुंबई - जॉन अब्राहम, अर्जुन कपूर, दिशा पटानी आणि तारा सुतारिया यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'एक व्हिलन रिटर्न' ( Ek Villain Return ) या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. मोहित सुरी दिग्दर्शित 'एक व्हिलन' या चित्रपटाचा सिक्वेल तब्बल 9 वर्षांनी आला आहे.
अभिनेता अर्जुन कपूरने ट्रेलर आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. पोस्टला कॅप्शन देताना त्याने लिहिलंय, ''व्हिलेनच्या विश्वात प्रवेश करण्याची वेळ आली आहे! #EkVillainReturns चा ट्रेलर आता आऊट झाला आहे. 29 जुलै 2022 रोजी तुमच्या जवळच्या सिनेमागृहात येत आहे.''
या ट्रेलरमध्ये ८ वर्षापूर्वी थांबलेले खुनी सत्र पुन्हा सुरू होताना दिसते. हे खुन कोण आणि का करते याचा छडा लावण्यासाठी पोलीस एकवटतात आणि पुढे सुरू होतो पुन्हा थरार. एकतर्फी प्रेमातील मुलींचे खुन व्हायला लागतात आणि हे खुन अज्ञात व्हिलेन करीत असतो. दिशा पटानी आणि तारा सुतारिया यांची ऑनस्क्रिन केमेस्टी जबरदस्त दिसत आहे. जॉन अब्राहम आणि अर्जुन कपूर यांच्यातील संघर्ष, अॅक्शन व स्टंट्स पाहण्यासारखे आहेत. चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवणारा ट्रेलर आहे.
दिशा पटानी, जॉन अब्राहम आणि तारा सुतारिया या चित्रपटात अर्जुन कपूरसोबत दिसणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाचे प्रमोशन सुरू होते. यापूर्वी या सर्व स्टार्सनी खलनायकाचा मुखवटा घालून चित्रपटाचे प्रमोशन केले होते.9 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'एक व्हिलन' या चित्रपटाच्या स्टारकास्टमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, रितेश देशमुख आणि श्रद्धा कपूर यांचा समावेश होता. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला होता. आता या चित्रपटाच्या सिक्वेलचा खलनायक तब्बल 9 वर्षांनंतर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार का हे पाहावं लागेल.
हेही वाचा -नीतू कपूरला फरहा खान म्हणाली, 'ऋषी कपूर पुन्हा येणार'!!