मुंबई- रोमँटिक म्युझिकल हिट चित्रपट आशिकीला 32 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने दिग्दर्शक दीपक तिजोरी, मुख्य अभिनेते राहुल रॉय आणि अनु अग्रवाल आणि गायक कुमार सानू यांनी इंडियन आयडॉल 13 च्या सेटवर उपस्थिती लावली होती. कारणही तसेच होते, इंडियन आयडॉलच्या एपिसोडची थीम चित्रपटाच्या सेलिब्रेशनची होती. इंडियन आयडॉल 13 वरील आशिकी स्पेशल एपिसोडने अनु अग्रवाल हिला अतिशय कटू अनुभव दिला आहे.
एपिसोडमध्ये अनुचे मोठे संभाषण होते. तिने या सिनेमाविषयी चर्चेत बरेच काही सांगितले होते पण ते एडिटमध्ये कापले गेले. सोनी टीव्हीवर प्रसारित झालेल्या भागामध्ये तिचे बोलणे वगळण्यात आले होते. तिचा अनुभव शेअर करताना, अभिनेत्रीने वेबलॉइडशी संभाषणादरम्यान अशीच प्रतिक्रिया दिली.
माजी सुपरमॉडेल अनु अग्रवालने धक्कादायक खुलासा केला की शोच्या निर्मात्यांनी तिचे बहुतेक फुटेज एडिट केले. "मी राहुल रॉयच्या शेजारी बसले होते आणि त्यांनी मला फ्रेममधून काढून टाकले. कृतज्ञतापूर्वक सांगते की, मी एक संन्यासी आहे. मला अजिबात अहंकार नाही. पण मला वाईट वाटते. मी तरुण प्रतिभावान गायकांना भेटले आणि मी पुरेसे बोलले. पण टेलिकास्टमध्ये एक शब्दही दाखवला गेला नाही. मला यात रस नाही का? मी ते सोडून दिले. मला बचावात्मक स्थितीत अजिबात उतरायचे नाही… आणि मला सोनी, एडिटरला किंवा कोणालाही दोष द्यायचा नाही., " असे अनु म्हणाली.