महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

आशिकी फेम राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोकचा झटका - अभिनेता राहुल रॉय बातमी

१९९० मध्ये प्रर्दशित आशिकी या सुपरहिट चित्रपटातील अभिनेता राहुल रॉय याला ब्रेन स्ट्रोकचा झटका आला आहे. त्याला मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

aashiqui-actor-rahul-roy-hospitalised-following-brain-stroke
अभिनेता राहुल रॉय

By

Published : Nov 29, 2020, 8:44 PM IST

Updated : Aug 12, 2022, 4:53 PM IST

मुंबई - 'आशिकी' या सुपरहिट चित्रपटातील अभिनेता राहुल रॉय याला ब्रेन स्ट्रोकचा झटका आला आहे. राहुल रॉय सध्या आपल्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणात कारगिल मध्ये होता. परंतु चित्रीकरणा दरम्यानच त्याची तब्येत अचानक बिघडल्याने त्याला मुंबईत आणण्यात आले. दरम्यान दोन दिवसांपूर्वी त्याला मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ५२ वर्षीय राहुल रॉय याला सध्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याला प्रोग्रेसिव्ह ब्रेन स्ट्रोक आल्याची माहिती समोर आली आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर असून तो उपचारांनाही योग्य प्रतिसाद देत आहे. तसेच त्याच्या प्रकृतीसाठी चाहत्यांकडूनही प्रार्थना केली जात आहे.


राहूल रॉयने १९९० मध्ये आशिकी या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली होती. त्या चित्रपटानंतर राहूलला प्रसिद्धीही मिळाली होती. त्यानंतर त्याने जूनून, फिर तेरी कहाणी याद आये सह तब्बल ४७ चित्रपटात काम केले. परंतु त्यानंतर हळूहळू तो चित्रपटसृष्टीपासून दूर होत गेला. त्यानंतर बिग बॉसच्या पहिल्या पर्वाचे विजेतेपद मिळवून तो पुन्हा चर्चेत आला होता. बऱ्याच वर्षानंतर तो एलएसी लाइव्ह द ब‌ॅटल या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण कारगिलमध्ये सुरू आहे.

हेही वाचा- एक देश एक निवडणूक : किती व्यवहार्य अन् किती आहेत अडचणी..?

Last Updated : Aug 12, 2022, 4:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details