महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

आमिर खानची सुवर्ण मंदिराला भेट, 'लाल सिंग चड्ढा'चे प्रमोशन अंतिम टप्प्यात - Advait Chandan Directed Lal Singh Chadha

बॉलिवूड अभिनेता आमिर खान ( Aamir Khan ) सध्या त्याच्या लाल सिंग चड्ढाच्या ( entertainer Laal Singh Chaddha ) प्रमोशनमध्ये गुंतला आहे. रिलीजला एक दिवस बाकी असताना आमिरने अमृतसर गाठून सुवर्ण मंदिराला भेट दिली आणि आशीर्वाद घेतले.

आमिर खानची सुवर्ण मंदिराला भेट
आमिर खानची सुवर्ण मंदिराला भेट

By

Published : Aug 10, 2022, 11:44 AM IST

Updated : Aug 10, 2022, 12:50 PM IST

अमृतसर ( पंजाब ) - बॉलिवूड अभिनेता आमिर खान ( Aamir Khan ) सध्या त्याच्या लाल सिंग चड्ढाच्या ( entertainer Laal Singh Chaddha. ) प्रमोशनमध्ये गुंतला आहे. रिलीजला एक दिवस बाकी असताना आमिरने अमृतसर गाठून सुवर्ण मंदिराला भेट दिली. या चित्रपटातील लाल सिंग चड्ढा ही व्यक्तीरेखा पंजाबी असल्यामुळे या राज्यातील नागरिकांमध्ये चित्रपटाबद्दल मोठे कुतुहल पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे या चित्रपटात शिख सरदार लाल सिंगची भूमिका आमिर साकारत आहे. अत्यंत निर्मळ मनाचा, बुध्यांक कमी असलेला लाल सिंग त्याने साकारलाय. या चित्रपटात त्याच्या तोंडी पंजाबी भाषा ऐकायला मिळते. त्यामुळे त्याचे पंजाब प्रमोशन तो करणार हे निश्चित होते. त्यानुसार त्याने आज सुवर्ण मंदिराला भेट दिल आणि गुरुंचे आशीर्वाद घेतले.

आमिर खानची सुवर्ण मंदिराला भेट

अद्वैत चंदन दिग्दर्शित, लाल सिंग चड्ढा हा चित्रपट अकादमी पुरस्कार विजेत्या 'फॉरेस्ट गंप' या 1994 च्या चित्रपटाचे अधिकृत हिंदी रूपांतर आहे ज्यात टॉम हँक्स मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. करीना कपूर खान, मोना सिंग आणि नागा चैतन्य देखील या चित्रपटाचा एक भाग आहेत.

हेही वाचा -लाल सिंग चड्ढा रिलीजपूर्वी चिंतेने आमिर खानची झोप उडाली

Last Updated : Aug 10, 2022, 12:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details