मुंबई -Ira Nupur Wedding :बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानची मुलगी आणि जावई यांचा शाही विवाह 10 जानेवारी रोजी म्हणजेच आज होणार आहे. उदयपूरमधील अरावली हिल्समध्ये असलेल्या सुंदर ताज अरावली रिसॉर्टमध्ये आमिर खानच्या मुलीच्या लग्नाची सर्व तयारी झाली आहे. आज संध्याकाळी मराठी रितीरिवाजांनुसार आयरा आणि नुपूर शिखरेचा विवाह होणार आहे. याआधी मंगळवारी या लग्नातील सुंदर संगीत सोहळा पार पाडला आहे, ज्यामध्ये आमिर खाननं जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. सध्या अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यात खान कुटुंब आणि शिखरे कुटुंब आनंदी दिसत आहेत.
आज होणार लग्न :आयरा आणि नुपूरच्या लग्नाच्या शेवटच्या दिवशी आज दुपारी 4 वाजता 'व्रत' फंक्शन होणार आहे, ज्यामध्ये वधू-वर लग्न करेल. आज बुधवारी मयूरबागेत विवाह समारंभ होईल. यामध्ये वधू-वर एकमेकांना वचन देतील. यासह विवाह सोहळा पूर्ण होईल. या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी मोठ्या संख्येने पाहुणेही पोहोचले आहेत. आयराच्या लग्नामध्ये आमिर खानचा भाचा इमरान खान देखील उपस्थित आहे. आयरा आणि नुपूरचं लग्न खूप भव्य पद्धतीनं होणार आहे. या जोडप्याला राजस्थानी परंपरा खूप आवडली आहे. आयरा आणि नुपूरच्या लग्नामध्ये राजस्थानी पद्धतीनं पाहुण्याचं स्वागत केलं जाणार आहे.