महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

आमिर खानची मुलगी इरा खान एंगेजमेंट, नुपूर शिखरेने सायकलिंग इव्हेंटमध्ये केले प्रपोज - इरा खान एंगेजमेंट

आमिर खानची मुलगी इरा खानने ( Aamir Khan's daughter Ira Khan ) तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत ( Nupur Shikahre ) एंगेजमेंट केली आहे. इराने इन्स्टाग्रामवर नुपूर प्रपोज करत असतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

आमिर खानची मुलगी इरा खान एंगेजमेंट
आमिर खानची मुलगी इरा खान एंगेजमेंट

By

Published : Sep 23, 2022, 11:08 AM IST

मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानची मुलगी इरा खानने ( Aamir Khan's daughter Ira Khan ) तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत ( Nupur Shikahre ) एंगेजमेंट केली आहे.

दोन वर्षांपासून नूपूरला डेट करत असलेल्या इरा खानने इंस्टाग्रामवर सायकलिंग इव्हेंटमधील एक व्हिडिओ शेअर केला. क्लिपमध्ये इरा स्टँडवर उभी असल्याचे दिसत आहे. सायकलिंग गियर घातलेला नुपूर तिच्याकडे येतो, गुडघ्यावर खाली बसतो आणि अंगठी काढत तिला मागणी घालताना दिसतो.

नुपूर इराला विचारतो: "तू माझ्याशी लग्न करशील का?", ज्याला ती आनंदाने उत्तर देते "हो!." दोघांनी चुंबन घेऊन करारावर शिक्कामोर्तब केले, तर तिचे मित्र आणि जमाव या जोडप्याच्या आनंदात सहभागी झाले व जोरदार चिअर्स केले.

आमिर खानची मुलगी इरा खान एंगेजमेंट

इरा ही आमिरची पहिली पत्नी रीना दत्त हिची मुलगी आहे, जिच्याशी ते २००२ मध्ये वेगळे झाले होते. आमिरला जुनैद नावाचा मुलगाही आहे.

हेही वाचा -अॅना डी आर्मास, 'ब्लोंड'मधील बोल्ड सीन व्हायरल होणे माझ्या 'कम्फर्ट झोनच्या बाहेर'

ABOUT THE AUTHOR

...view details