महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

आमिर खानची मुलगी इरा खानची नुपूर शिखरेशी झाली एंगेजमेंट

आमिर खान आणि चित्रपट निर्माती रीना दत्ता यांची मुलगी, इरा खानने शुक्रवारी तिचा दीर्घकाळाचा जोडीदार नुपूर शिखरेशी एंगेजमेंट केली.

इरा खानची नुपूर शिखरेशी झाली एंगेजमेंट
इरा खानची नुपूर शिखरेशी झाली एंगेजमेंट

By

Published : Nov 19, 2022, 9:43 AM IST

मुंबई- सुपरस्टार आमिर खान आणि चित्रपट निर्माती रीना दत्ता यांची मुलगी, थिएटर दिग्दर्शिका इरा खानने शुक्रवारी तिचा दीर्घकाळाचा जोडीदार नुपूर शिखरेशी एंगेजमेंट केली.

इराने सप्टेंबरमध्ये जाहीर केले होते की ती लवकरच सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनरशी एंगेजमेंट करणार आहे. आमिर खान, त्याच्या माजी पत्नी रीना दत्ता आणि किरण राव, तसेच इम्रान खान आणि मन्सूर खान यांच्यासह तिचे कुटुंबीय एंगेजमेंट सोहळ्याला उपस्थित होते.

इराने लाल रंगाचा लांब ऑफ शोल्डर गाउन निवडला होता, तर शिखरने समारंभासाठी काळ्या रंगाचा ट्यूक्सेडो ड्रेस घातला होता. हे जोडपे दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे.

हेही वाचा -बिग बॉस मराठीमध्ये स्पर्धकांना धक्का, घरातून दोन स्पर्धकांची होणार गच्छंती

ABOUT THE AUTHOR

...view details