महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Aamir return to big screens : आमिर खान रुपेरी पडद्यावर परतणार, पुढच्या ख्रिसमसला होणार धमाका - पुढच्या ख्रिसमसला होणार धमाका

आमिर खान पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर परत येण्यासाठी सज्ज झाला आहे. लाल सिंग चड्ढा हा त्याचा शेवटचा चित्रपट प्रेक्षकांना भुरळ घालण्यात अपयशी झाल्यानंतर काही काळापासून तो पडद्यापासून दुरावला होता.

Etv Bharat
Etv Bharat

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 29, 2023, 6:30 PM IST

मुंबई - गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लाल सिंग चड्ढा चित्रपटाला मिळालेल्या अपयशानंतर आमिर खान नाराज झाला होता. तेव्हापासून त्याने चित्रपट निर्मितीपासून स्वतःला दूरच ठेवले आहे. आमिर खानने आपल्या कुटुंबासोबत काही वेळ घालवण्यासाठी अभिनयातून ब्रेक घेतल्याचे जाहीर केले होते. आता तो पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर परतण्याची तयारी करताना दिसणार आहे.

प्रसिद्ध ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्शच्या म्हणण्यानुसार, आमिर खान प्रॉडक्शनने चित्रपटाच्या रिलीजची तारीख देखील लॉक केली असल्याचे समजते. तो पुढच्या वर्षी ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर २० डिसेंबर रोजी आपला आगामी चित्रपट प्रदर्शित करणार आहे. या चित्रपटाचा सामना 'वेलकम टू द जंगल' या अक्षय कुमार स्टारर चित्रपटाशी होणार आहे. 'वेलकम' फ्रँचाइज बनवत असलेला हा चित्रपटाचा तिसरा सीक्वेल असून यात नाना पाटेकर, परेश रावल, अनिल कपूर आणि कॅटरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका असतील.

आमिर खानच्या आगामी चित्रपटाबद्दलचा अधिक तपशील अद्याप समोर आलेला नाही. आमिर 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटात करीना कपूर खानसोबत अखेरचा दिसला होता. अद्वैत चंदन दिग्दर्शित हा चित्रपट १९९४ मध्ये रिलीज झालेल्या फॉरेस्ट गम्प या हॉलिवूड चित्रपटाचा अधिकृत हिंदी रिमेक होता. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालला नाही. असे असले तरी आमिरच्या चाहत्यांना आणि चित्रपटातील कलाकारांनाही हा चित्रपट आवडला होता.

अलिकडेच एक इव्हेन्टमध्ये बोलताना करीना कपूरने लाल सिंग चड्ढाबद्दल अभिमान व्यक्त केला होता. ती म्हणाली, 'लाल सिंग चढ्ढा हा एक उत्तम चित्रपट होता. आमिर खानसोबत चित्रपटाचा हिस्सा असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. तो बॉलिवूडमधला एक हुशार आणि संवेदनशील व्यक्ती आहे. त्याने हा चित्रपट अत्यंत तळमळीने केला होता. माझं म्हणणं आहे की पुढील २० वर्षांनंतरही तुम्ही हा चित्रपट पाहाल तर तुम्हाला तो पाहून अभिमान वाटेल. आमिर खानने नेहमीच त्याच्या भूमिकांमध्ये खूप प्रयोग केले आहेत. त्याने नेहमी वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि जे लोक असे काही वेगळे करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना शंभर टक्के यश मिळतेच असे नाही.'

ABOUT THE AUTHOR

...view details