महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

पाहा, आझादसोबत आंब्याचा आस्वाद घेताना आमिर खानचे भन्नाट फोटो - आमिर खान आंबा खाताना फोटो

आमिर खानने त्याचा धाकटा मुलगा आझादसोबतचे फोटो शेअर केले आहेत. ताज्या फोटोंमध्ये आमिर आझादसोबत आंब्याचा आस्वाद घेताना दिसत आहे.

आमिर खान आझादसोबत आंबे खाताना
आमिर खान आझादसोबत आंबे खाताना

By

Published : Apr 20, 2022, 4:30 PM IST

मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान आणि त्याचा मुलगा आझाद राव खान यांचे आंब्याचा आस्वाद घेतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आमिरने नुकतेच कबूल केले होते की त्याने आपल्या कुटुंबाला गृहीत धरले होते. यातून सावरण्यासाठी आमिरने सर्वात जास्त गरज होती तेव्हा त्याच्या मुलांसोबत वेळ घालवला. ताज्या फोटोनुसार आमिर गमावलेला वेळ भरून काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. यासाठी तो आझादसोबत क्वालिटी टाईम व्यतीत करीत आहे.

बुधवारी आमिरने त्याच्या प्रॉडक्शन बॅनर आमिर खान प्रॉडक्शनच्या इंस्टाग्राम हँडलवर आपल्या धाकट्या मुलासोबत फोटोंची स्ट्रिंग शेअर केली. फोटोंमध्ये पिता-पुत्र आंब्याची चव घेताना दिसत आहेत. फोटो शेअर करताना आमिरने लिहिले, "तुम्ही स्वत:ला आणि तुमच्या कुटुंबाला असे आंब्यासोबत ट्रीट केले आहे का?"

आझाद हा आमिरचा त्याची माजी पत्नी किरण राव यांचा मुलगा आहे. गेल्या जुलैमध्ये लग्नाच्या १५ वर्षानंतर तो आणि किरण वेगळे झाले. त्यानंतर या दोघांनी सांगितले आहे की ते त्यांच्या मुलाचे सह-पालक बनतील. आमिरची पहिली पत्नी रीना दत्ता हिच्यासोबत इरा आणि जुनैद खान ही दोन मुले आहेत. राना दत्ता यांच्याशी आमिरचा लग्नाच्या 16 वर्षांनी घटस्फोट झाला होता.

हेही वाचा -HBD Aamir Khan : आमिर खानला त्याच्या वाढदिवसानिमित्त किरण रावकडून मिळाले सर्वोत्तम गिफ्ट

ABOUT THE AUTHOR

...view details