मुंबई- Aamir daughter Ira Khan wedding: हिंदी सिनेसृष्टीचा सुपरस्टार आमिर खानने अखेरीस आपली मुलगी इरा खानच्या लग्नाचा मूहुर्त निश्चित केला आहे. हा दिवस त्याच्यासाठी भावनिकदृष्ट्या खूप खास आणि आव्हानात्मक असणार आहे. पुढील वर्षी हा विवाह पार पडणार असल्याचं आमिर खाननं एका चर्चे दरम्यान सांगितलंय. त्यानं होणारा आपला जावई नुपूर शिखरेचं खूप कौतुक केलंय. आमिर खानची मुलगी इरा हिच्या नैराश्येच्या काळात नुपूरनं तिची खूप काळजी घेतल्याचं तो म्हणाला.
एका न्यूज माध्यामाच्या संवादात आमिरने सांगितलं की, त्याच्या मुलीचे लग्न पुढच्या वर्षी ३ जानेवारीला नुपूर शिखरेशी पार पडेल. मुलगी इरानं तिच्यासाठी योग्य जीवनसाथी शोधल्याचं समाधान त्यानं बोलून दाखवलं आणि नुपूर शिखरेवर कौतुकाचा वर्षावही केला. आमिरनं सांगितलं की नुपूर ही खरोखरच अशी व्यक्ती आहे जिने इराला भावनिक मदत केली. त्यानं निराशेच्या गर्तेत गेली असताना तिला सावरलं आणि तिच्या पाठीशी तो ठामपणे उभं राहिला.
अभिनेता आमिर खान पुढे म्हणाला, 'हा फिल्मी डायलॉग वाटेल पण नुपूर मला मुलासारखा वाटतो.' आमिरने पुढे त्याचे कौतुक केले आणि म्हटले की नुपूर इतका छान मुलगा आहे की तो खरोखरच कुटुंबाचा एक भाग असल्याचं त्याला वाटतंय. आमिर खूप भाविनक असल्यामुळे इराच्या लग्नात तो खूप रडेल अशी चिंता त्याच्या कुटुंबीयांना सतावत आहे.