मुंबई- आमिर खानचा बहुप्रतीक्षित लाल सिंग चड्ढा हा चित्रपटा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. याचा ट्रेलर रविवारी आयपीएस अंतिम सामन्याच्या वेळी रिलीज करण्यात आला. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मात्र काही जणांनी आमिर खानवर व त्याच्या चित्रपटावर टीका करण्याची संधी शोधली आहे. या चित्रपटावर बहिष्कार करण्याची मागणी हे आमिर खान द्वेषी लोक करीत आहेत. यासाठी त्यांनी आमिर खानचे जुने वाद खोदून काढले आणि चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
आमिर खानच्या ‘भारत असहिष्णु आहे’ या विधानाची आठवण करून देताना एका ट्विटर युजरने लिहिले की, “ज्याला भारतात सुरक्षित वाटत नाही त्याने त्याचे चित्रपट भारतात प्रदर्शितही करू नयेत.'' दुसर्या नेटिझनने सांगितले की करीनाची नेपोटिझमवरील कमेंट चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे कारण आहे, “माझ्याकडे लाल सिंग चड्ढा न पाहण्याची दोन कारणे 1. करीना कपूरने आम्हाला चित्रपट न पाहण्यास सांगितले. 2. मी फॉरेस्ट गंप पाहिला आहे. त्याचे आकर्षण नष्ट करू इच्छित नाही. ” एका ट्विटर युजरने ट्रेलरमध्ये आर्मीचा संदर्भ देखील दाखवला आणि लिहिले, “त्याचा पुढचा चित्रपट येत आहे. ज्यात तो आर्मी युनिफॉर्ममध्ये मानसिकदृष्ट्या विकलांग म्हणून काम करत आहे. आर्मीवरही खूप विनोद आहेत. लोक या कचऱ्यावर बहिष्कार टाकतील अशी आशा आहे. गणवेश, बिल्ला वापरणे आणि असे चित्रपट बनवण्याबद्दल त्याला IA कडून मंजुरी कशी मिळाली माहित नाही ??