महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

आमिर खानने साजरा केला आई झीनत हुसैन यांचा अनोखा वाढदिवस - Aamirs Mothers Birthday

आमिर खानने माजी पत्नी किरण राव, मुलगा आझाद यांच्यासोबत आई झीनत हुसैन यांचा वाढदिवस साजरा केला.आमिर, किरण आणि कुटुंबातील इतर सर्व सदस्यांनी झीनत हुसैनसाठी वाढदिवसाचे गाणेही गायले. या व्हिडिओला नेटिझन्सकडून खूप गोड प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.

आमिर खान आई झीनत हुसैन
आमिर खान आई झीनत हुसैन

By

Published : Jun 15, 2022, 2:46 PM IST

मुंबई - सुपरस्टार आमिर खान अलीकडेच त्याची आई झीनत हुसैन यांचा वाढदिवस एका खास पद्धतीने साजरा केला. यावेळी त्याची माजी पत्नी माजी पत्नी किरण राव व मुलगा आझाद उपस्थित होते. आमिरच्या फॅम-जॅमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे ज्यामध्ये आमिरची आई तिच्या घरी तिच्या वाढदिवसाचा केक कापताना दिसत आहे. वाढदिवसाचा केक कापताना आमिर आणि किरणचा मुलगा आझाद आजीच्या शेजारी बसलेला दिसतो.

आमिर, किरण आणि कुटुंबातील इतर सर्व सदस्यांनी झीनत हुसैनसाठी वाढदिवसाचे गाणेही गायले. या व्हिडिओला नेटिझन्सकडून खूप गोड प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.

"किती सुंदर," एका इंस्टाग्राम युजरने आपल्या कमेंटमध्ये म्हटलंय. दुसर्‍या युजरने लिहिले, “कुटुंबासोबत वेळ घालवण्यापेक्षा जास्त काहीही चांगले नाही.''

दरम्यान वर्क फ्रंटवर आमिर खान त्याच्या आगामी 'लाल सिंग चड्ढा'मध्ये प्रमुख भूमिका साकरताना पाहायला मिळणार आहे. हा चित्रपटा 1994 च्या मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेल्या हॉलिवूडच्या फॉरेस्ट गंपचा हिंदी रिमेक आहे. करीना कपूर खान आणि मोना सिंह देखील या चित्रपटाचा एक भाग आहेत, जो 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

काही दिवसांपूर्वी आमिरने या चित्रपटाच्या ट्रेलरचे लॉन्च केले ज्याने प्रेक्षकांना भावूक केले. जवळपास 3 मिनिटांच्या या ट्रेलरने चित्रपटाचा नायक लाल सिंग चड्ढाच्या आकर्षक आणि निरागस जगाची झलक दाखवली आहे.

हेही वाचा -दिलीप कुमारच्या आठवणीने व्याकुळ झाल्या सायरा बानो

ABOUT THE AUTHOR

...view details