मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री फातिमा सना शेख मंगळवारी मुंबईत पिकलबॉल खेळताना दिसले. त्याचा पिकलबॉल खेळत असतांना व्हिडिओ हा इंस्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दोघे एकाच टीममध्ये खेळताना दिसत आहेत. या व्हिडिओत आमिरने काळ्या ट्रॅक पॅंटसह लाल रंगाचा टी-शर्ट परिधान केली आहे, तर फातिमाने काळ्या रंगाचा शॉर्ट्स आणि राखाडी टी-शर्ट घातलेली दिसत आहे. काही दिवसापुर्वी आमिर खान हा मुलगी इरा खानसोबत पिकलबॉल खेळतांना दिसला होता.फातिमा गेल्या अनेक वर्षांपासून आमिर खानच्या कुटुंबाच्या जवळ आहे, तसेच फातमाची इरा खानसोबतही फार जवळीकता आहे. गेल्या वर्षी इरा खानने नुपूर शिखरेशी साखरपुडा केला होता. त्यावेळी, फातिमाने त्या दोघांसाठी एक पोस्ट शेअर केली होती.
आमिरची पहिली पत्नी रीना दत्तापासून त्याला एक मुलगी इरा खान आणि मुलगा जुनैद खान आहे. तसेच आमिरची दुसरी पत्नी किरण रावपासून त्याला आझाद नावाचा एक मुलगा आहे. फातिमाने दंगल आणि ठग्स ऑफ हिंदोस्तान सारख्या चित्रपटांमध्ये आमिरसोबत काम केले आहे. तसेच यापूर्वी आमिर आणि फातिमाच्या लिंक-अप अफवांना या पसरल्या होत्या. त्यावेळी फातिमाने या अफवा आहे असे सांगितले होते. तसेच काही बातम्यामध्ये फातिमा आणि आमिरने लग्न केले आहे, असे सांगितल्या गेले होते. मात्र असा काही नसून त्यांच नात हे मैत्री आहे असे आमिरने देखील सांगितले होते. फातिमाने सांगितले की, अशा अफवा पसरल्यामुळे ती विचलित' व्हायची मात्र आता ती हे हाताळायला शिकली आहे. तिने पुढे सांगितले की, तिला आधी स्वतःला समजावून सांगण्याची गरज वाटत होती, परंतु तिचा दृष्टीकोन काळानुसार बदलला आहे. 2018 च्या एका मुलाखतीत, फातिमा म्हटले होते की, 'मला कोणाला समजावून सांगण्याची गरज वाटत नाही कारण मला वाटते की तुम्ही काहीही केले तरी लोक तुमच्याबद्दल बोलतील. जर कोणी तुमच्यावर काही आरोप करत असेल, तर पहिली प्रवृत्ती म्हणजे त्याला योग्य ते सांगणे, का गोष्टी अशा असतात. जर तुम्ही आक्रमक असाल तर हल्ला कराल. जर तुम्ही अधीन असाल, तर तुम्ही त्याबद्दल बोलाल.' असे तिने मुलाखातीत सांगितले होते.