मुंबई- आमिर खानच्या ‘चॅम्पियन्स’ या आगामी प्रोजेक्टच्या बातम्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. अलीकडेच "लाल सिंग चड्ढा" मध्ये दिसलेला अभिनेता त्याच्या बालपणीच्या मित्राच्या कार्यक्रमासाठी दिल्लीत आला होता. यावेळी त्याने आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल भाष्य केले.
‘चॅम्पियन्स’ या चित्रपटात आमिर खान भूमिका करणार किंवा नाही याबद्दल अनेक तर्क वितर्क लावले जात होते. मात्र स्वतः आमिरनेच याविषयावर पडदा टाकला आहे. तो म्हणाला, "ही एक अप्रतिम स्क्रिप्ट आहे, ही एक सुंदर कथा आहे, आणि हा एक अतिशय हृदयस्पर्शी आणि सुंदर चित्रपट आहे. पण मला वाटते की मला ब्रेक घ्यायचा आहे. मला माझ्या कुटुंबासोबत रहायचे आहे, मला माझ्या आई आणि माझ्या मुलांसोबत रहायचे आहे," असे आमिर म्हणाला.