महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Aamir Ali And Shamita Shetty : शमिता शेट्टीला डेट करत असल्याच्या अफवांवर आमिर अलीने मौन सोडले... - आमिर अली आणि शमिता शेट्टी

अभिनेता आमिर अली हा शमिता शेट्टीला डेट करत असल्याच्या अफवा आता झपाट्याने पसरत आहे. याप्रकरणी आता स्वतः आमिरने स्पष्टीकरण दिले आहे.

Aamir Ali And Shamita Shetty
आमिर अली आणि शमिता शेट्टी

By

Published : Jul 17, 2023, 6:42 PM IST

मुंबई : अभिनेता आमिर अली टिव्ही जगतातील अतिशय प्रसिद्ध चेहरा आहे. 'एफआयआर', 'दिल्ली वाली ठाकूर गर्ल्स', 'सरोजिनी-एक नई पहेली' सारख्या शोमध्ये काम करून तो घराघरात प्रसिद्ध झाला आहे. तो 'नच बलिए' सारख्या रिअ‍ॅलिटी शोचा देखील एक भाग होता, ज्यामध्ये तो त्याची एक्स पत्नी संजीदा शेखसोबत दिसला होता आणि शोचा विजेतादेखील झाला होता. आमिर अलीच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे झाले तर त्याचा नुकताच संजीदा शेखसोबत घटस्फोट झाला आहे. काही दिवसापूर्वी आमिर अली हा अभिनेत्री शमिता शेट्टीसोबत स्पॉट झाला होता, त्यानंतर शमितासोबत त्याच्या डेटींगच्या अफवा पसरल्या होत्या. आमिरने आता याप्रकरणी खुलासा केला आहे.

आमिर अलीने केला खुलासा :काही दिवसापूर्वी आमिर अली शमिता शेट्टीला डेट करत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. दोघेही एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र स्पॉट झाले होते. दरम्यान, त्याने या अफवांवर आता खुलासा केला आहे. याप्रकरणाबद्दल बोलतांना त्याने म्हटले, 'जेव्हा मी कोणासोबत बाहेर जातो तेव्हा माझ्या लिंक अप स्टोरीज येऊ लागतात. मी सिंगल आहे, याचा अर्थ असा नाही की, तुम्ही मला सर्वांशी जोडाल. मी माझ्या काही मैत्रिणींसोबत जेवायला गेलो होतो. ज्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही गेलो होतो, तिथे भारतीय क्रिकेट संघामधील एकाचा वाढदिवस साजरा होत होता. यादरम्यान आम्ही थोड्या गप्पा मारल्या त्यानंतर मी तिला सोडून देण्यासाठी बाहेर गेलो. त्यानंतर मला दुसऱ्या दिवशी माझ्या मित्राने कॉल केला आणि सांगितले की, मी ऐकले आहे की तू शमिताला डेट करत आहेस आणि त्यानंतर त्याने मला युट्युब लिंकदेखील पाठवली.

शमिता आणि आमिरने एकत्र चित्रपट पाहणेही बंद केले :पुढे त्याने सांगितले, 'मी सिंगल आहे म्हणून मी कोणाला डेट करत नाही. प्रेस माझ्याकडे बघते. मी आणि शमिता आधी चित्रपट एकत्र बघायचो, पण आता आम्ही ते करणे बंद केले आहे. आम्ही अजूनही मित्र आहोत, आम्ही कुठेही बाहेर जात नाही. याबद्दल मी जास्त विचार करत नाही, कारण मी जर अशा गोष्टीवर लक्ष दिले तर मी जगू शकणार नाही.

एक्स पत्नीच्या डेटिंगच्या अफवांवर आमिर अली काय म्हटले : आमिर अलीने अलीकडेच त्याची एक्स पत्नी संजीदा शेख हर्षवर्धन राणेला डेट करत असल्याच्या अफवांवरही म्हटले, 'हे आता एक मुक्त जग आहे. तिने आनंदी राहावे आणि तिला जे करायचे आहे ते करावे अशी माझी इच्छा आहे. मला त्यात अजिबात पडायचे नाही. मला माहित नाही की कोण कोणाला डेट करत आहे आणि कोण तिच्यासाठी चांगले आहे, मी तिच्यासाठी आनंदी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details