महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Actor Vishal Narrowly Escapes : शुटिंगवेळी फिल्म स्टुडिओत घुसला ट्रक, अभिनेता विशालचा थरारक अनुभव - Vishals thrilling experience

तमिळ अभिनेता विशाल शुटिंगच्या सेटवर झालेल्या अपघातातून थोडक्यात बचावला आहे. मार्क अँटोनी चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान एक भरधाव ट्रक स्टुडिओत घुसला होता. या अपघातातून वाचल्याबद्दल विशालने ईश्वराचे आभार मानले आहेत.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Feb 24, 2023, 2:12 PM IST

चेन्नई- चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान मेहमीच किरकोळ अपघात होत असतात. परंतु अत्यंत भीषण असा अपघात घडल्याची घटना तमिळ चित्रपट मार्क अँटोनीच्या सेटवर घडली आणि यात केवळ नशिबाने अनेकांचे प्राण वाचले. तामिळ अभिनेता विशालचा त्याच्या आगामी चित्रपटाच्या सेटवर शुट करत असताना त्याचा अक्षरशः मृत्यू जवळ आला होता. त्याचा हा मृत्यू जवळचा अनुभव भयानक आणि धक्कादायक होता. या भयावह भागाचे फोटो आणि व्हिडिओंनी सोशल मीडियावर खूप खळबळ उडवून दिली आहे. विशाल सहकलाकार एस जे सूर्यासोबत एका तीव्र अ‍ॅक्शन सीनचे शूटिंग करत असताना ही घटना घडली.

विशालने ट्विटरवर सर्वशक्तिमान ईश्वराचे आभार मानणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये मोठ्या स्टुडिओमध्ये सेट लागला असून चित्रपटाचे शुट सुरू आहे. अशात स्टुडिओच्या बाहेरुन शुटिंचे साहित्य घेऊन आलेला एक अनियंत्रीत ट्रक स्टुडिओत घुसताना दिसतो. या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले आहे. भरधाव येणारा हा ट्रक पहिल्यांदा पार्टिशनची भिंत तोडून स्टुडिओत शिरतो. यावेळी स्टुडिओत मोठा जमाव आहे. सीननुसार अभिनेता विशाल खाली झोपला आहे. ट्रक स्टुडिओत घुसल्याने गोंधळ उडतो, काहीजण विशालच्या दिशेने धावतात त्याला उठण्यास मदत करतात. दरम्यान वेगात येणाऱ्या ट्रकची दिशा बदलते आणि विशालचे नशिब बलवत्तर म्हणून वाचतो.

त्यानंतर क्रूने विशालला सुरक्षित ठिकाणी हलवले. या अपघाताबद्दल बोलताना अभिनेता विशाल म्हणाला की, काही सेकंद आणि काही इंचामध्ये वाचलो त्याबद्दल ईश्वराचे आभार. विशालच्या या व्हिडिओला ५० लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. विशालच्या प्रोडक्शन हाऊस विशाल फिल्म फॅक्टरीने एका इंस्टाग्राम अपडेटमध्ये म्हटले आहे की, ही घटना काही तांत्रिक बिघाडामुळे घडली आहे. निवेदनात लिहिले आहे की, भयानक आणि धक्कादायक. काही तांत्रिक कारणामुळे हा अपघात झाला असला तरी सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.

एस जे सूर्यहास यांनी विशालच्या पोस्टला कोट-ट्विट केले आणि लिहिले, खरोखरच देवाचे आभार... अपघाताने, सरळ मार्गाने जाण्याऐवजी, लॉरी थोडी तिरकस गेली आणि अपघात झाला, जर ती सरळ आली असती तर आम्ही दोघेही वाचलो नसतो. देवाचे आभारी आहोत की आम्ही सर्वजण बचावलो.

मार्क अँटोनी चित्रपटाचे दिग्दर्शन अधिक रविचंद्रन यांनी केले आहे. विशाल आणि एसजे सूर्याव्यतिरिक्त, चित्रपटात रितू वर्मा, अभिनय, निझलगल रवी, रेडिनकिंग्सले आणि वाय जी महेंद्रन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. एस. विनोद कुमार यांनी निर्मिती केली आहे.

हेही वाचा -Meet Amarjeet Jaikar: एका रात्रीत स्टार बनला अमरजीत जयकर, सोनू सूदने दिली पहिली ऑफर

ABOUT THE AUTHOR

...view details