मुंबई - पुष्पा द रुल या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या चित्रपटाचे शुटिंग वेगाने सुरू असून यातील अभिनेता फहद फसिलचे अत्यंत महत्त्वाचे शुटिंग शेड्यूल पूर्ण झाले आहे. यावेळी पुष्पाचा बदला घेण्यासाठी इन्स्पेक्टर भंवर सिंग शेखावत पुन्हा ताकतीने उतरणार आहे. पुष्पा २ मध्ये अल्लु अर्जुन आणि फहद फसिल यांच्यातील पडद्यावरचा संघर्ष चित्तथरारक असणार हे निश्चित मानले जाते.
पुष्पा २ चा ट्रेलर - अलिकडेच एप्रिल महिन्याच्या ७ तारखेला अल्लु अर्जुनच्या वाढदिवसानिमित्य पुष्पा द रुल सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. यात जेलमधून फरार झालेल्या पुष्पाचा शोघ घेतला जातो. त्याची रक्ताने माखलेली कपडे पोलिसांना मिळतात आणि तो मृत झाल्याचे ते घोषित करतात. इकडे पुष्पाचे चाहते रस्त्यावर उतरुन दंगा सुरू करतात, असे चित्र ट्रेलरमधून पाहायला मिळाले होते.
पुष्पा आणि भंवर सिंग शेखावतची टक्कर - पुष्पा द रायझिंग या पहिल्या भागात चंदन तस्करीत माहिर झालेला पुष्पाची इन्स्पेक्टर भंवर सिंग शेखावतशी भेट होते. ऐन लग्नाच्या प्रसंगाआधी ही त्यांची भेट शेखावतला कमी लेखणारी, त्याचा अपमान करणारी आहे. यात इन्स्पेक्टर भंवर सिंग शेखावतची अत्यंत वाईट हालत पुष्पा करतो.
पुष्पाचा सूड घेण्यासाठी इन्स्पेक्टर भंवर सिंग शेखावत परतणार- पुष्पा चित्रपटात इन्सपेक्टरची भूमिका करणारा फहद फसिल हा साऊथमधील सर्वात प्रतिभाशाली अभिनेता आहे. केवळ डोळ्यांनी तो बोलत असतो. मल्याळम चित्रपटातून अभिनयाची कारकिर्द सुरू करणारा फहद याने अनेक प्रकारच्या भूमिकांना न्याय दिलाय. कुंभलिंगी नाईट या चित्रपटात एक खररनाक व्हिलन साकारल्यानंतर त्याच्याकडून खूप अपेक्षा वाढल्या आहेत. पुष्पा सारख्या रांगड्या नायकाला मुकाबला करण्यासाठी तितक्याच क्षमतेचा टक्कर देणारा अभिनेता निर्मात्यांना हवा होता. यातूनच फहद फसिलची निवड झालीय आणि पुष्पा २ मध्ये त्याची भूमिका वाखाणण्याजोगी असेल हे निश्चित मानले जात आहे. फहद फसिलचा चाहता वर्गही मोठा आहे, अर्जुनच्या चाहत्याप्रमाणेच तेदेखील पुष्पा २ च्या रिलीजची प्रतीक्षा करत आहेत.
हेही वाचा -Cannes Film Festival 2023 : उर्वशीच्या दुसऱ्या दिवसाच्या लूकने सोशल मीडियावर चांगलीच उडवून दिली खळबळ