Dalip Tahil : बॉलीवूडमधील 65 वर्षीय अभिनेता दलीप ताहिलला दोन महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयानं पाच वर्षे जुन्या प्रकरणात शिक्षा सुनावली केली आहे. हे प्रकरण 2018 सालचे आहे, जेव्हा दलीप दारूच्या नशेत गाडी चालवताना आढळले होते. यादरम्यान त्यांनी एका ऑटोरिक्षाला आपल्या कारनं धडकले होते. यावेळी एक युवक आणि युवती देखील गंभीर जखमी झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार न्यायालयानं पुराव्याच्या आधारे दलीपला 2018 च्या हिट-अँड-रन प्रकरणात दोषी ठरवले आहे. पुराव्यात असे म्हटले गेले आहे की, अपघातादरम्यान दलीपनं त्याच्या रक्ताचे नमुने पोलिसांना तपासणीसाठी नकार दिला होता. त्यानंतर तरीही त्यांचे नमुने घेण्यात आले. याशिवाय डॉक्टरांच्या अहवालानुसार रक्ताच्या नमुन्यात दारू आढळून आली होती.
डॉक्टरांच्या अहवालावर निर्णय देण्यात आला : न्यायालयानं हा निकाल डॉक्टरांच्या अहवालावरून दिला आहे. या अहवालानुसार यावेळी दलीप ताहिलला नीट चालता देखील येत नव्हते. याशिवाय त्यांना निट बोलता देखील येत नव्हते. आता या प्रकरणात ताहिल यांना दोषी ठरवून कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दलीप ताहिल यांनी मद्यपान करून वाहन चालविल्याप्रकरणी दोन महिन्यांच्या शिक्षेबाबत बोलताना सांगितले की, 'मी दंडाधिकारी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो, दंडाधिकारी न्यायालयाच्या निर्णयाला मी सत्र न्यायालयात आव्हान देणार आहे. मी मॅजिस्ट्रेट कोर्टाकडून ऐकले आहे की ही निलंबित शिक्षा आहे, ही 2018 ची केस आहे आणि त्यावेळी झालेला अपघात हा एक किरकोळ अपघात होता, ज्यामध्ये एका महिलेला किरकोळ दुखापत झाली होती.