मुंबई - 54th IFFI: यंदाचा 54 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोव्यात पार पडत आहे. देशभरातील चित्रपट प्रेमींसाठी हा महोत्सव एक पर्वणी असतो. नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कार्यक्रमाचं आयोजन करत आहे. चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात काम करणारे निर्माता, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि कलाकार यांच्यात आणि प्रेक्षकांच्यात तेट संवाद व्हावा या हेतूनं या महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं.
2023 इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) मध्ये नवीन अनेक श्रेणीतील चित्रपट रिलीज केले जातील. या महोत्सवात हॉलीवूड अभिनेता मायकेल डग्लस यांना सत्यजित रे एक्सलन्स इन फिल्म लाइफटाइम पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या महोत्सवात 'गाला प्रीमियर्स'मध्ये चित्रपट आणि मालिका दाखवण्यात येतील. सिने तारे तारका आणि लोक यांच्यातील संबंध वाढवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. सलमान खानची भाची अलिझेह अग्निहोत्री हिची भूमिका असलेला फर्रे या चित्रपटाचं स्क्रिनिंग गोव्यातील या महोत्सवात होणार आहे. या शिवाय फेस्टिव्हलमध्ये पंकज त्रिपाठीच्या कडक सिंग आणि गांधी टॉक्सचा वर्ल्ड प्रीमियर देखील होईल ज्यात एआर रहमानचा साउंडट्रॅक आहे आणि त्यात विजय सेतुपती, अरविंद स्वामी आणि अदिती राव हैदरी हे कलाकार आहेत.
किशोर पाडुरंग बेलेकर यांच्या 'गांधी टॉक्स'मध्ये हिंदू पौराणिक कथा आणि समुद्र मंथन या कथेच्या वेधक संदर्भांसह भांडवलशाही, वर्णद्वेष आणि समाजाचं खोलवर घेतलेल्या शोधावर सामाजिक भाष्य यात पाहायला मिळेल. या महोत्सवात अनेक चित्रपटांचं स्क्रिनिंग पाहायला मिळणार आहे, यामध्ये सौमेंद्र पाधी यांनी दिग्दर्शन केलेला व सलमान खान प्रॉडक्शनने बनवलेला 'फर्रे' या चित्रपटातून एक रोमांचक प्रवास घडणार आहे. अनिरुद्ध रॉय चौधरी यांचा चित्रपट 'कडक सिंग' हा चित्रपट प्रतिगामी स्मृतिभ्रंश झालेल्या इन्स्पेक्टर ए.के. श्रीवास्तव या व्यक्तिरेखेभोवती फिरतो. आजारी असूनही, तो चिटफंड घोटाळ्याचे गुंतागुंतीचे गूढ उलगडण्यात त्याच्या भूतकाळातील अनेक गोष्टी ऐकून आणि तो हॉस्पिटलमध्ये कसा आला याची रंजक कथा यात पाहायला मिळणार आहे. मिलिंद राऊचा 'द व्हिलेज' हा चित्रपट प्रेक्षकांना एका गूढ आणि थरारक कथानकात गुंतवणारा आहे.
डिअर जस्सी, हर्री ओम हर्री, रौतू की बेली, धूथा, दिल है ग्रे आणि ग्रे गेम्स सारख्या इतर उत्कृष्ट चित्रपटांसह 54 व्या IFFI च्या गाला प्रीमियर्स विभागात विविध आणि मनोरंजक सिनेमॅटिक अनुभव प्रेक्षक घेऊ शकणार आहेत. सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवांपैकी एक असलेल्या इफ्फी फिल्म फेस्टीव्हलमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा समावेश आहे. हा महोत्सव अनुभवी आणि नवीन चित्रपट निर्मात्यांना त्यांचे उत्कृष्ट कार्य जगभरातील प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठीचा एक मंच प्रदान करतो.