मुंबई - वाटलं होतं तसंच झालं... बॉलीवूडवर बहिष्कार टाकणाऱ्यांना वाटलं की बॉलिवूडचा बादशाह संपला, पण नाही, हा बादशाह आता पठाण बनून चित्रपटाच्या पडद्यावर परतला आहे. .. तेही अधिक दिव्या अग्निपरीक्षा पार करुन. शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाने देश आणि जगात तुफान निर्माण केले आहे. 25 जानेवारी रोजी चित्रपटाच्या फर्स्ट डे फर्स्ट शोच्या दिवशी चित्रपटगृहांवर चित्रपटाच्या प्रेक्षकांची अशी तुफान गर्दी झाली आहे की चित्रपटाच्या स्क्रीन्सची संख्या वाढवली जात आहे. आता 'पठाण' भारतासह 100 हून अधिक देशांमध्ये 8000 स्क्रिन्सवर चालू आहे.
चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करुन पठाणचे स्क्रिन्स वाढले असल्याचे माहिती दिली आहे. त्यांनी लिहिलंय, अभूतपूर्व प्रतिसादामुळे पठाणच्या शोमध्ये वाढ करण्यात आली आहे. आजवरच्या सर्वाधिक स्क्रिन्सवर झळकण्यात पठाण यशस्वी झाला आहे. हिंदी भाषेतील पठाण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर वादळ निर्माण केले आहे. पहिल्या शोनंतर वितरकांनी ३०० शो वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
आता पठाणची एकूण जगभरातील स्क्रीन संख्या आता 8,000 स्क्रिन झाली आहे भारतात पठाण 5,500 स्क्रीनवर झळकला आहे तर 2,500 स्क्रीन्सवर परदेशात दिसत आहे., असे तरण आदर्श यांनी म्हटलंय.
किंग खानचे दमदार पुनरागमन- वातावरणातील हा बदल अशा वेळी आला आहे जेव्हा 'पठाण'ने पहिल्या दिवसाच्या फर्स्ट शोमुळे दहशत निर्माण केली आहे. प्रेक्षकांनी पूर्ण पैसा वसूल, असे या चित्रपटाचे वर्णन केले आहे आणि चित्रपटगृहांच्या आत आणि बाहेर दिवाळीसारखे वातावरण आहे. प्रेक्षक थिएटरमध्ये फटाके फोडत आहेत आणि 4 वर्षांनंतर शाहरुखच्या पुनरागमनाचे मोकळेपणाने स्वागत करत आहेत.