महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

28th Critics Choice Awards: RRR ठरला परदेशी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपट, नाटू नाटूला सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार

आरआरआर चित्रपटाने 28 व्या क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्समध्ये आणखी दोन पुरस्कार पटकावले आहेत. ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांच्या भूमिका असलेल्या आरआरआर ( RRR ) ला त्याच्या नाटू नाटू ट्रॅकसाठी सर्वोत्कृष्ट गाण्यासाठी समीक्षकांचा चॉईस पुरस्कार मिळाला. लॉस एंजेलिस येथे झालेल्या समारंभात सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटासाठी क्रिटिक चॉईस अवॉर्डही मिळाला.

28th Critics Choice Awards
28th Critics Choice Awards

By

Published : Jan 16, 2023, 9:59 AM IST

वॉशिंग्टन (यूएस) - प्रतिष्ठित गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकल्यानंतर, दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या मॅग्नम ऑपस पीरियड अॅक्शन ड्रामा चित्रपट 'RRR' ने 28 व्या क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्समध्ये आणखी दोन पुरस्कार पटकावले आहेत. ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांच्या भूमिका असलेल्या आरआरआर ( RRR ) ला त्याच्या नाटू नाटू ट्रॅकसाठी सर्वोत्कृष्ट गाण्यासाठी समीक्षकांचा चॉईस पुरस्कार मिळाला. लॉस एंजेलिस येथे झालेल्या समारंभात सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटासाठी 'क्रिटिक' चॉईस अवॉर्डही मिळाला.

क्रिटिक्स चॉइस अवॉर्डच्या ट्विटर हँडलने एक पोस्ट शेअर केली, - 'सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपटासाठी क्रिटीक चॉइस अलॉर्ड्स पुरस्कार विजयाबद्दल आरआरआर चित्रपटाचे कलाकार आणि क्रूचे अभिनंदन.'

आरआरआर टीमने आपल्या ट्विटरवर लिहिले, 'पुन्हा एकदा नाटू नाटू. हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आम्ही आरआरआर चित्रपटातील सर्वोत्कृष्ट गाण्यासाठी क्रिटिक्स चॉइस पुरस्कार जिंकला आहे. एमएम किरवाणी यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर भाषण केले.'

नाटू नाटू संगीतकार एमएम किरावाणी व्हिडिओमध्ये बोलताना म्हणाले, धन्यवाद मी या पुरस्काराने खूप भारावून गेलो आहे. समीक्षकांकडून हा अप्रतिम पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी येथे आलो आहे. गाण्याचे कोरिओग्रफर, गीतकार, माझे गायक, माझे प्रोग्रामर आणि अर्थातच माझे दिग्दर्शक यांच्या वतीने सर्व समीक्षकांचे आभार."

किरवाणी यांच्या नाटू नाटू या गाण्याला नुकताच लॉस एंजेलिस फिल्म क्रिटिक्स असोसिएशन (LAFCA) मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत कोर पुरस्कार मिळाला.आरआरआरच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजने अपडेट शेअर केले आहे. "लॉस एंजेलिस फिल्म क्रिटिक्सवर आरआरआर चित्रपटासाठी बेस्ट म्यूझिक स्कोअरचा पुरस्कार जिंकल्याबद्दल आमचे संगीत दिग्दर्शक एमएम किरवाणी यांचे अभिनंदन."

आरआरआर ही काल्पनिक कथा दोन तेलुगू स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्या जीवनावर आधारित आहे. राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी अनुक्रमे मुख्य भूमिका साकारल्या. या चित्रपटाने जगभरात 1,200 कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटात आलिया भट्ट, अजय देवगण आणि श्रिया सरन यांच्याही भूमिका होत्या.

एमएम कीरावानी यांची 'नाटू नाटू' ची ही गीतरचना, गायक राहुल सिपलीगुंज आणि काळ भैरव यांचे उच्च उर्जा सादरीकरण, प्रेम रक्षित यांचे अनोखे नृत्यदिग्दर्शन आणि चंद्रबोसचे गीत हे सर्व घटक आहेत जे आरआरआर चित्रपटातील गाण्यात समुहाला आपल्या नृत्य कौशल्याने वेडे बनवतात.

हेही वाचा -Rakhi Sawant In Hijab : लग्नानंतर राखी सावंत फातिमा दिसली भगव्या हिजाबमध्ये, यूजर्स म्हणाले...

ABOUT THE AUTHOR

...view details