मुंबई : २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत भीषण दहशतवादी हल्ला झाला होता. (26 11 Mumbai Attack) या हल्यात देशातील अनेक वीर शहीद झाले. (26/11 मुंबई अटॅक). ताज हॉटेल सोबतच दहशतवाद्यांनी स्टेशन, कॅफे आणि अगदी हॉस्पिटललाही लक्ष्य केले होते. या हत्याकांडात 174 लोकांचा मृत्यू आणि 300 हून अधिक लोक जखमी झाले होते. या हल्ल्यावर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडमध्येही अनेक चित्रपट बनवण्यात आले आहेत. (films made on Mumbai attack). या सिनेमांतून हा काळा दिवस दाखवण्यात आला असून या हल्ल्याची व्यथा मांडण्यात आली आहे. जाणून घ्या या दहशतवादी हल्यांवर बनलेल्या काही चित्रपटांची संक्षिप्त माहिती..
मेजर: हा चित्रपट 2008 च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेले लष्करी अधिकारी मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित आहे. पटकथा लिहिण्याबरोबरच दक्षिणेतील अभिनेता आदिवी शेषने चित्रपटात मेजरची भूमिका साकारली होती. चित्रपटात सई मांजरेकर, शोभिता धुलिपाला, प्रकाश राज, रेवती आणि मुरली शर्मा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचे कलेक्शन उत्तम होते.
हॉटेल मुंबई :२६ नोव्हेंबर रोजी झालेल्या हल्ल्यात ताज हॉटेल हे दहशतवाद्यांचे मुख्य लक्ष्य होते. 'हॉटेल मुंबई' हा चित्रपट याच ताज हॉटेल हल्ल्यावर आधारित आहे. हॉटेलचे कर्मचारी लोकांचे प्राण कसे वाचवतात आणि हल्ल्याच्या वेळी हॉटेलमध्ये काय होते हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अँथनी मारस यांनी केले आहे. या चित्रपटात अनुपम खेर मुख्य भूमिकेत आहेत.