मुंबई : टोविनो थॉमस-स्टारर '2018 एव्हरी इज ए हिरो' मल्याळम सिनेमाच्या इतिहासातील सर्वात मोठा इंडस्ट्री हिट चित्रपट म्हणून उदयास आला आहे. हा चित्रपट जगभरात 100 कोटी रुपये कमावणारा सर्वात वेगवान मल्याळम चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने आता फक्त 25 दिवसात जगभरात 160 कोटी रुपये कमवून आणखी एक मैलाचा दगड ओलांडला आहे, आता हा चित्रपट पाच भाषांमध्ये जबरदस्त धाव घेणार आहे.
मॉलीवूड चित्रपटाने रचला इतिहास :मॉलीवूडच्या इतिहासात प्रथमच, एका चित्रपटाचे देशभरात स्वागत होत आहे. या प्रतिसादामुळे मल्याळम चित्रपट उद्योगाला देशांमध्ये एक नवीन ओळख मिळाली आहे. '2018 एव्हरी इज ए हिरो'ला सर्वत्र थिएटरमध्ये स्टँडिंग ओव्हेशन्स मिळत असल्याचे म्हटले जाते. या चित्रपटाचे दिग्दर्शिन जूड अँथनी जोसेफ यांनी केले आहे. तसेच या चित्रपटात टोविनो, आसिफ अली, कुंचको बोबन, लाल, नारायण, विनीत श्रीनिवासन, अपर्णा बालमुरली आणि तन्वी या प्रमुख कलाकारांचा समावेश आहे.
बॉक्स ऑफिसवर केली भरभक्कम कमाई : तसेच , हिंदी भाषिक प्रदेशांमध्ये, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या सोमवारी थोड्या प्रमाणात घट झाली. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात ८.९५ कोटींची कमाई केली होती. चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीची बॉक्स ऑफिसवर 7.23 टक्के घसरण झाली आहे. चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 1.7 कोटी रुपयांची कमाई केली होती, परंतु दुसऱ्या दिवशी 82.35 टक्क्यांनी लक्षणीय वाढ झाली. तसेच या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ३.१ कोटींची कमाई केली. बॉक्स ऑफिसच्या सुरुवातीच्या रिर्पोटनुसार, चित्रपटाने 33.87 टक्क्यांनी वाढ केली आणि तिसऱ्या दिवशी 4.15 कोटी रुपये कमावले. यामुळे चित्रपटाचे एकूण कलेक्शन 12.8 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
केरळ महापूराची पुन्हा निर्मीती : प्रॉडक्शन डिझायनर आणि कला दिग्दर्शक मोहनदास यांच्या नेतृत्वाखालील सक्षम निर्मिती आणि कला संघांच्या सर्जनशील पाठिंब्याने केरळचा महापूर पुन्हा निर्माण करण्याला दिग्दर्शकाला यश आले आहे. चित्रपटाची निर्मिती वेणू कुन्नापिल्ली, सी.के. काव्या फिल्म कंपनी आणि पीके प्राइम प्रोडक्शनच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. तसेच पद्मा कुमार, अँटो जोसेफ, मलिकप्पुरम काव्या फिल्म कंपनीचा हा दुसरा बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर आहे.
हेही वाचा :Gemadpanthi trailer released : विनोद, रहस्य, प्रेम, थ्रिल असे संपूर्ण पॅकेज असलेली वेब सिरीज 'गेमाडपंथी', ट्रेलर झाला प्रदर्शित!