महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 1, 2022, 3:58 PM IST

ETV Bharat / entertainment

अफाट लोकप्रिय किंग खानची १० सदाबहार लोकप्रिय गाणी

शाहरुख खान २ नोव्हेंबर रोजी त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. अनेक चढ उतार पाहिलेल्या शाहरुखला अलिकडे काही वर्षे यश हुलकावणी देत आलं आहे. पण त्यामुळे त्याच्या लोकप्रियतेत काहीच फरक पडत नाही. त्याला या यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत त्यामध्ये सदाबहार हिट ठरलेली गाणीही आहेत. आपण त्याच्या शेकडो गाण्यातील टॉप १० गाण्यांची निवड त्यासाठी केली आहे. पाहा ही गाणी...

किंग खानची १० सदाबहार लोकप्रिय गाणी
किंग खानची १० सदाबहार लोकप्रिय गाणी

मुंबई- शाहरुख खान २ नोव्हेंबर रोजी त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. सिनेमाच्या जगतात शाहरुख खान एक असा अभिनेता आहे ज्याच्या लोकप्रियतेवर त्याच्या बॉक्स ऑफिसवरील यश आणि अपयशांचा कोणताही परिणाम होत नाही. वाढदिवसाच्या निमित्ताने सोशल मीडियावर प्रेम करणाऱ्यांची संख्या अतिप्रचंड आहे, तशीच त्याच्या बंगल्याच्या बाहेर त्याची झलक पाहण्यासाठी येणाऱ्यांचीही संख्या प्रचंड आहे. भारत आणि जगभरातील लाखो सिनेप्रेमींच्या हृदयावर राज्य करत असल्यामुळे त्याला किंग खान म्हटले जाते, यात काही आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. त्याच्या या अफाट यशाचे श्रेय त्याच्या सिनेमांना, त्यामागे काम करणाऱ्या क्रिएटीव्ह टीमला, दिग्दर्शक, निर्माता यांना तो देत असतो. त्याला या यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत त्यामध्ये सदाबहार हिट ठरलेली गाणीही आहेत. आपण त्याच्या शेकडो गाण्यातील टॉप १० गाण्यांची निवड त्यासाठी केली आहे. पाहा ही गाणी...

1.तुझे देखा तो ये जाना सनम (दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे)

जर एखादे गाणे शाहरुख खानचे समानार्थी बनले असेल तर ते हे असावे. मोहरीच्या शेतातील या गाण्यातून शाहरुख आणि काजोलने करोडोंना प्रेमात पाडले.

२.छैय्या छैय्या (दिल से)

आपल्या गूढ प्रियकराबद्दल गाणारा एक माणूस ट्रेनच्या टपावर बसून शाहरुखच्या रुपात दिसला होता. ए.आर. रहमानच्या संगीतापासून ते गुलजारची कविता आणि सुखविंदर सिंगच्या अप्रतिम आवाजापर्यंत, हे एक उत्कृष्ट गाणे आहे. शाहरुख खान आणि मलायका अरोराचे चालत्या ट्रेनमध्ये डान्स करतानाचे जबरदस्त दृश्य आपण कधीच विसरू शकत नाही.

३.ये दिल दिवाना (परदेस)

रिलीज झाल्यावर, ये दिल दीवाना हे तुटलेल्या हृदयांचे गीत बनले. आजही हजारो प्रेम विरांचे हे ह्रदयाची धडकन वाढवणारे गाणे आहे.

४.सूरज हुआ मधम (कभी खुशी कभी गम)

शाहरुख खान, काजोल आणि इजिप्त. याबद्दल अधिक बोलण्याची गरज नाही. आजही हे गाणे ऐकून प्रेमात पडलेले गहिवरुन जातात आणि नृत्यासाठी पाथ थिरकवतात.

5.मैं कोई ऐसा गीत गाउं (येस बॉस)

शाहरुख खानला पाहल्यानंतर जाणवंत ते प्रेम आणि हे गाणे देखील प्रेमाचंच आहे. येस बॉस मधील शाहरुख खान आणि जुही चावला सोबतचे हे गोड गाणे सर्व काळात गोडच ठरत आले आहे.

6.मेरे मेहबूब मेरे सनम (डुप्लिकेट)

शाहरुख खान प्रेमापासून पळत आहे असा कोणी विचार केला तरी असेल, असे वाटत नाही. डुप्लिकेटमधील या आनंदी नंबरमध्ये शाहरुख खान सोनाली बेंद्रे आणि जुही चावलासोबत दोन सुंदर महिलांमध्ये अडकलेला पुरुष म्हणून दाखवला आहे.

7. तेरे नैना (माय नेम इज खान)

शाहरुख खान आणि काजोल या सुंदर रोमँटिक गाण्यात पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. मुख्य जोडीची दमदार केमिस्ट्री, शंकर-एहसान-लॉय यांचे संगीत आणि जावेद अख्तरचे कालातीत गीत यामुळे हे गाणे तुमच्या प्लेलिस्टमध्ये असणे आवश्यक आहे.

8.कल हो ना हो (कल हो ना हो)

शाहरुख खानचा समानार्थी बनलेला आणखी एक क्लासिक म्हणजे कल हो ना होचा टायटल ट्रॅक. मृत्यूकडे टक लावून पाहणारा माणूस म्हणून, शाहरुख खानने साकारलेला अमन त्याच्या आजूबाजूच्या लोकांना जगायला आणि प्रेम करायला शिकवतो आणि संपूर्ण चित्रपटात रोमान्स आणि प्रेमाने भारलेले हे गाणे अमनच्या संदेशाला मूर्त रूप देते.

9.मैं अगर कहूँ (ओम शांती ओम)

शाहरुख खान आणि त्याच्या सर्व पात्रांची शौर्य आणि मोहकता एखाद्या गाण्याद्वारे दर्शवायची असेल तर ते ओम शांती ओममधील मैं अगर कहूँ असेल.

10.मितवा (कभी अलविदा ना कहना)

मितवा हे दोन व्यक्तींवर चित्रित केलेले गाणे आहे, ज्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनाबाहेर प्रेम मिळत आहे. सहानुभूती दाखवण्यासाठी ही एक कठीण परिस्थिती असली तरी, शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांची अधोरेखित केमिस्ट्री आणि शांत प्रतिष्ठेमुळे हे गाणे पुढील अनेक वर्षांसाठी सर्वांचे आवडते प्रेमगीत राहिले आहे.

आम्हाला खात्री आहे की ही यादी तुम्हाला दीर्घकाळ आनंदी ठेवेल. शाहरुखच्या वाढदिवसानिमित्य ही यादी आम्ही तुमच्यासाठी बनवली. आम्हाला खात्री आहे तुम्ही ही गाणी पाहून प्रसन्न व्हाल.

हेही वाचा -ऐकावं ते नवलच : बप्पीदांचे 'जिम्मी जिम्मी' गाणे बनले चीनी लोकांच्या आंदोलनाचे हत्यार

ABOUT THE AUTHOR

...view details