महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Tiger 3 trailer countdown start : 'टायगर 3' ट्रेलरसाठी उलटी गिनती सुरू, सलमान-कतरिनाच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला - टायगर 3 ट्रेलर लॉन्चसाठी उलटी गिनती सुरू

Tiger 3 trailer countdown start : सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर 'टायगर 3' या चित्रपटाबद्दलचा उत्साह चाहत्यांमध्ये स्पष्ट दिसत असताना, चित्रपटाच्या निर्मात्यांनी ट्रेलर लॉन्चसाठी उलटी गिनती सुरू केली. टायगर 3 च्या ट्रेलरला 10 दिवस बाकी आहेत आणि येत्या 16 ऑक्टोबर रोजी ट्रेलर प्रदर्शित होत आहे.

Tiger 3 trailer countdown start
टायगर 3 ट्रेलरसाठी उलटी गिनती सुरू

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 6, 2023, 1:13 PM IST

मुंबई - Tiger 3 trailer countdown start :सुपरस्टार सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या भूमिका असलेला बहुप्रतीक्षित 'टायगर 3' हा चित्रपट आगामी काही महिन्यांमध्ये प्रदर्शित होणार आहे. काही दिवसापूर्वी एक मनोरंजक संदेश टायगरनं चाहत्यांसाठी दिला होता. त्यानंतर चित्रपटाचे निर्माते आता 'टायगर 3' ट्रेलर रिलीज करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या चित्रपटाबद्दलची हवा गरम असताना चित्रपटाच्या टीमनं 'टायगर 3' च्या टीमनं ट्रेलर लॉन्चसाठीची उलटी गिनती सुरू केली आहे.

यशराज फिल्म्स (YRF) च्या वतीनं शुक्रवारी टायगर 3 ट्रेलर लॉन्चसाठी वातावरण तापवण्यासाठी चाहत्यांना ट्रेलर रिलीज तारखेची आठवण करुन दिली आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियावर लिहिलंय, 'टायगर 3 चं काउंटडाउन सुरू झाले आहे! टायगर 3 च्या ट्रेलरला 10 दिवस बाकी आहेत - 16 ऑक्टोबर रोजी ट्रेलर प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट या दिवाळीत सिनेमागृहात येत आहे. हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये चित्रपट देश विदेशात रिलीज होत आहे.'

'टायगर 3' बद्दल बोलताना सलमान खाननं अलीकडेच आपला जीव धोक्यात घालावा लागणाऱ्या 'टायगरचे सर्वात धोकादायक मिशन' असं वर्णन केलं होतं. हा चित्रपट अनेक धक्कादायक ट्विस्ट आणि टर्नने भरलेला असल्याचं सलमान म्हणाला होता. 'या चित्रपटात गुप्तहेर असलेला टायगर दिवस वाचवण्यासाठी जीवघेण्या मिशनवर निघणार आहे. ट्रेलर आणि चित्रपटाकडून तुम्ही अनपेक्षित गोष्टींची अपेक्षा करा आणि एका अ‍ॅक्शन मनोरंजनासाठी सज्ज व्हा. 'टायगर 3' मध्ये खरोखरच गहन कथानक असेल. माझ्यासाठी, 'टायगर 3' चे कथानक मला झटपट खिळवून ठेवते. आदित्य चोप्रा आणि त्याची टीम काय दर्जाचं मनोरंजन घेऊन आली आहे यावर माझा विश्वासच बसत नव्हता.', असं 'टायगर 3' बाबत सलमान खान म्हणाला.

मनीष शर्मा दिग्दर्शित 'टायगर 3' हा चित्रपट 2023 च्या दिवाळीच्या मुहूर्तावर हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्येप्रदर्शित होणार आहे. सलमान आणि कतरिना यांच्या शिवाय या चित्रपटात इमरान हाश्मी देखील खलनायकाच्या भूमिकेत आहे. मात्र याबाबतचा अधिक तपशील निर्मात्यांनी अजून उलगडलेला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details