मुंबई - नुकत्याच पार पडलेल्या ९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये हॉलिवूडच्या अनेक तारे तारकांना भारतीय कलाकारांशी हस्तांदोलन केले, गळाभेटी घेतल्या आणि सेल्फीही काढल्या. टॉलिवूड आणि बॉलिवूड अत्यंय समरस होऊन हॉलिवूडशी मिसळून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. हॉलिवूडची अभिनेत्री मिंडी कलिंग हिने पठाण चित्रपटाची अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत सेल्फी घेताना दिसली. तर आरआरआर चित्रपटाचे स्टार राम चरण आणि त्याची पत्नी उपासना अक्किनेनी यांच्यासोबतही पोझ देताना दिसत आहेत.
अमेरिकन टेलिव्हिजन स्टार अभिनेत्री असलेल्या मिंडी कलिंगने इन्स्टाग्रामवर 13 मार्चच्या ऐतिहासिक दिवशी ऑस्कर सोहळ्यात भारतीय सेलिब्रिटींसोबत काढलेल्या फोटोंची एक कॅरोसेल पोस्ट शेअर केली. पहिला फोटो सेल्फीचा आहे, ज्यामध्ये दीपिका मिंडीकडे झुकलेली आहे आणि फोटो घेताना दिसत आहे. दोन्ही सुंदर अभिनेत्री फोटोमध्ये जबरदस्त दिसत आहेत. पुढील फोटो हा ऑस्कर आफ्टरपार्टीमध्ये RRR फेम राम चरण आणि त्याची पत्नी उपासना यांच्यासोबत पोज देताना मिंडीचा आहे. इतर फोटोमध्ये मिंडी कलिंग दक्षिण आशियाई तारे तारकासोबत फोटोंना पोझ देतानाचे आहेत.
द ऑफिस स्टार मिंडी कलिंगने फोटो शेअर केल्यानंतर त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. अनेक भारतीय व अमेरिकन चाहते तिच्या या फोटोंचे कौतुक करत आहेत. अनेकांनी पूर्व आणि पश्मि तारे तारकांचे हे सुंदर मिलन असल्याचे म्हटलंय. अनेकांना त्यांच्या भेटीबद्दल अभिमान वाटत असल्याचे लिहिलंय. एकाच फ्रेममध्ये दिग्गज सामावल्याचेही अनेकांनी लिहिलंय.
९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दीपिका पदुकोणने पहिल्यांदाच भाग घेत शोचे प्रेझेन्टेशन केले. ती जेव्हा बोलायला उभी राहिली तेव्हा अनेकांनी तिला चियर्स केले. अत्यंत आत्मविश्वासाने तिने सूत्रसंचालन करताना नाटू नाटू या गाण्याचा परिचय उपस्थितांना करुन दिला. आरआरआर चित्रपटात हे गाणे कोणत्या प्रसंगी येते, वसाहतवादा विरोधच्या स्वातंत्रपूर्वकालिनी परिस्थितीचाही तिने आपल्या संवादात समाचार घेतला व नाटू नाटू गाण्याचे गायक राहुल सिपलीगुंज आणि काळ भैरवसह कलाकारांना तिने आमंत्रीत केले. नाटू नाटू गाण्याला जेव्हा ऑस्कर पुरस्कार जाहीर झाला तेव्हा आनंदाने जल्लोष करणाऱ्यांमध्ये दीपिकाही होती.
हेही वाचा -Sidharth Malhotra : ऑस्कर जिंकल्यावर सिद्धार्थ मल्होत्राने दिली नाही प्रतिक्रिया; ट्रोल झाल्यामुळे चाहते आले बचावासाठी