मुंबई- मार्वल्स वेस्टलँडर्स: स्टार-लॉर्ड या आगामी हिंदी ऑडिबल ओरिजिनल पॉडकास्ट मालिकेचा ट्रेलर सॉन्च करण्यात आला आहे. या ट्रेलरमधून आपल्याला जो रॅगटॅग क्रूचा करिष्माई नेता स्टार-लॉर्डचा परिचय होतो. त्याला नवीन आणि परिचित आव्हानांचा सामना करावा लागतो. त्याच्या ट्रेडमार्कची बुद्धी चातुर्य आणि साहस ऑडिओ फॉरमॅटमध्ये आणण्यात आले आहे. रहस्यभेद करत, थरारक अॅक्शन सीक्वेन्स असलेला जटिल कॅरेक्टर डायनॅमिक्सची कथा इमर्सिव्ह साउंडस्केपमध्ये उलगडण्यात आली आहे.
ऑल-स्टार व्हॉइस कास्ट आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या कथानकासह मार्वल्स वेस्टलँडर्स: स्टार-लॉर्ड ही मालिका आपल्याला एक अनोखा ऑडिओ अनुभव देण्यासाठी सज्ज आहे. मार्वलच्या वेस्टलँडर्ससाठी अनेक दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळत असून स्टार-लॉर्डमध्ये पीटर क्विलच्या भूमिकेत सैफ अली खान, रॉकेटच्या भूमिकेत व्रजेश हिरजी, कोरा म्हणून सुशांत दिवगिकर, कलेक्टर म्हणून अनंगशा बिस्वास, एम्मा फ्रॉस्टच्या भूमिकेत मनिनी डे आणि क्रेव्हन द हंटरच्या भूमिकेत हरजीत वालिया यांचा समावेश आहे.
मार्वल्स वेस्टलँडर्स: स्टार-लॉर्डच्या ट्रेलरने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांनी गौरवउद्गार काढले आहेत. ही मालिका पाहण्यासाठी चाहते अक्षरशः उतावीळ झाले असल्याचे प्रतिक्रियामधून जाणवत आहे. प्रत्येक वेगळ्या मार्वल सुपर हिरोवर केंद्रित असलेले या मालिकेचे एकूण सहा सीझन आहेत. मार्वल्स वेस्टलँडर्स: स्टार-लॉर्डचा पहिला सिझन 28 जून 2023 रोजी केवळ ऑडिबलवर प्रीमियर होईल, त्यानंतरचे सीझन 2023 आणि 2024 मध्ये रिलीज होतील.
स्टार-लॉर्ड अर्थात पीटर क्विल हा एक अमेरिकन कॉमिक पुस्तकांमध्ये दिसणारा एक काल्पनिक सुपरहिरोचे पात्र आहे. स्टीव्ह एंगलहार्ट आणि स्टीव्ह गॅन यांनी तयार केलेले पात्र १९७६ मध्ये वाचकांचे आवडते पात्र बनले. यातील मेरेडिथ क्विल आणि स्पार्टोई जेसन यांचा मुलगा, पीटर क्विल हा स्टार-लॉर्ड या नावाने इंटरप्लॅनेटरी पोलिस म्हणून काम करतो. अॅनिमेटेड टेलिव्हिजन मालिका, टॉइज आणि ट्रेडिंग कार्डसह पीटर क्विल हे पात्र वाचकांच्यामध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. अभिनेता ख्रिस प्रॅटने मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स चित्रपटांमध्ये पीटर क्विलची भूमिका साकारली आहे. प्रॅटने प्रथम 2014 च्या गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी मधील लाइव्ह-अॅक्शन चित्रपटात भूमिका साकारली होती. त्यानंतर नंतर गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी आणि अॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉरमध्ये क्विल म्हणून तो दिसला होता.