मुंबई - करीना कपूरचे वडील रणधीर कपूर यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचा धक्कादायक खुलासा अभिनेता रणबीर कपूरने एका मुलाखतीत केला होता. रणबीरने सांगितले की त्याचे चुलते रणधीर हे डिमेंशियाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहेत. रणबीर कपूरच्या या खुलाशानंतर कपूर कुटुंब आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये घबराट पसरली आहे. आता रणधीर कपूर स्वतः समोर आले आणि रणबीरच्या या खुलाशावर प्रतिक्रिया दिली.
रणधीर कपूर म्हणाले की माझा पुतण्या काहीही बोलतो. असे काहीही झाले नाही आणि मी ठीक आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये मला कोरोना झाला होता. जेव्हा रणधीर यांना विचारण्यात आले की रणबीर असे का म्हणाला? यावर रणधीर म्हणाले की, ''त्याला जे हवे ते बोलण्याचा अधिकार आहे.''
'''शरमाजी नमकीन' चित्रपट पाहिल्यानंतर रणधीर कपूरने ऋषी कपूर यांच्यासी बोलण्यास सांगितले होते,'' असा खुलासाही रणबीर कपूरने मुलाखतीत केला होता. यावर रणधीर कपूर यांनी स्पष्टपणे सांगितले की, ''मी असे काहीही बोललो नाही, मी नुकताच गोवा महोत्सवातून परतलो आहे.'' नुकताच रणबीर कपूरचे वडील ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट 'शरमाजी नमकीन' रिलीज झाला आहे, जो प्रेक्षकांना खूप आवडला आहे. कपूर कुटुंबानेही हा चित्रपट एकत्र पाहिला आहे.
रणबीर कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो यावर्षी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो आलिया भट्टसोबत आहे. हा चित्रपट यावर्षी 9 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे शूटिंग संपले आहे. हा चित्रपट बनायला पाच वर्षे लागली. रणबीर आणि आलियाचा एकत्र हा पहिलाच चित्रपट आहे.
हेही वाचा -अमिताभ रश्मिका फोटो : बिगबींनी लिहिले 'पुष्पा'..चाहते म्हणाले, 'ही तर श्रीवल्ली'