महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Priyanka turns cheerleader for hubby Nick : प्रियांका चोप्रा बनली निक जोनासची चीअरलीडर, यूएस कॉन्सर्टमध्ये 'चेन्स'वर केली धमाल - प्रियंका आणि सोफी

प्रियांका चोप्रा जोनास तिचा गायक पती निक जोनासच्या यूएसमध्ये कॉन्सर्टमध्ये दिसली होती. यावेळी अभिनेत्री प्रियंकाने चेन्स या हिट गाण्यावर डान्स केला. यावेळी तिची भावजय सोफी टर्नरही सभागी झाली होती.

प्रियंका चोप्रा बनली निक जोनासची चीअरलीडर
प्रियंका चोप्रा बनली निक जोनासची चीअरलीडर

By

Published : Mar 20, 2023, 2:38 PM IST

मुंबई- ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा जोनास तिच्या यूएस कॉन्सर्टमध्ये पती निक जोनाससाठी चीअर करताना दिसली. यावेळचा व्हिडिओ इंटरनेटवर खूप चर्चेत आहे. प्रियंका किती मनापासून पतीच्या समर्थनार्थ उतरली आहे हे त्यांच्या चाहत्यांचा चांगलेच लक्षात राहणारे आहे. यात ती निक जोनासच्या चेन्स गाण्याचा पुरेपुर आनंद घेत आहे. इन्स्टाग्रामवर फॅन पेजेसने या कार्यक्रमाच्या व्हिडिओ क्लिप अपलोड केल्या आहेत. असाच एक व्हिडिओ शेअर करताना आनंद व्यक्त केलाय. त्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये जबरदस्त प्रतिक्रियांचा ओघ सुरू झाला.

प्रियांका नियमितपणे पती निकच्या कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी वेळ काढते. ती त्याची सर्वात मोठी फॅन आणि समर्थक आणि चीअरलीडर आहे आणि हा व्हिडिओ त्याचा पुरावा आहेत. जोनास बंधू- निक, जो आणि केविन जोनास हे कॉन्सर्टसाठी यूएस दौर्‍यावर आहेत. प्रियांकासोबत गेम ऑफ थ्रोन्स फेम जोची पत्नी सोफी टर्नर देखील या व्हिडिओत दिसली. प्रियांकाने याप्रसंगी पांढरा बॉडीकॉन ड्रेस निवडला आणि कमीत कमी मेकअपसह तिचे केस खुले ठेवले, तर सोफी टर्नर काळ्या रंगाच्या कपड्यात सुंदर दिसत आहे. दुसरीकडे, निक चमकदार लाल रंगाच्या पॅंटसूटमध्ये दिसला. अमेरिकन गायक निकने लाल कोटने त्याचा लूक पूर्ण केला.

शोमध्ये प्रियांका आणि सोफी यांच्यातील एक प्रेमळ क्षण देखील पाहायला मिळाला. दोघींनी गालावर चुंबन देत एकमेकांचे स्वागत केले. दोघींचे खूप चांगले नाते बनले असून दोघेही एकमेकींना बहिणी मानतात. प्रियांका आणि सोफी या दोघांनीही या मैफिलीचा आनंद लुटला आणि जोनास बंधूंच्या परफॉर्मन्समध्ये रमताना दिसल्या.

अलिकडेच प्रियांका चोप्राने तिच्या सिटाडेल मालिकेमधील पहिला लूक सोशल मीडियावर शेअर केला होता. यात ती मालिकेत गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणारा आहे. सिटाडेलच्या पहिल्या लूकमध्ये ती अप्रतिम दिसत आहे. प्रियांकाने फोटो शेअर केल्यानंतर लगेचच, अनेक सेलिब्रिटींनी हार्ट आणि फायर इमोजीज टाकून तिचे अभिनंदन केले होते. सिटाडेल हा शो प्राइम व्हिडिओवर 28 एप्रिल रोजी दोन भागांसह प्रीमियर होणार आहे. या मालिकेचे उर्वरित एपिसोड दर शुक्रवारी ते 26 मे पर्यंत आठवड्यातून एकदा टाकण्यात येतील.

हेही वाचा -Dalljiet Kaur And Nikhil Patel : टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर हनीमूनसाठी पोचली थायलंडला

ABOUT THE AUTHOR

...view details