महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

प्रियंका चोप्राने शेअर केला जखमी चेहऱ्याचा फोटो - सिटाडेल शुटिंगमद्ये प्रियंका जखमी

प्रियांका चोप्राने पु्हा एकदा सिटाडेल या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टचे शुटिंग सुरू केले आहे. तिने जखमी चेहऱ्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर चाहते चिंतेत पडले आहेत.

प्रियंका चोप्रा
प्रियंका चोप्रा

By

Published : May 18, 2022, 11:14 AM IST

मुंबई - प्रियांका चोप्रा आई झाल्यानंतर पुन्हा एकदा शुटिंगच्या कामावर परतली आहे आणि तिने शूटमधील एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती जखमी दिसत आहे. प्रियांका चोप्राने अलीकडेच 'मदर्स डे 2022' रोजी चाहत्यांना तिच्या मुलीची पहिली झलक दाखवली होती.

प्रियांका चोप्राने तिच्या परदेशी प्रोजेक्ट 'सिटाडेल'च्या शूटिंगच्या पुढील शेड्यूलसाठी होकार दिला होता व तिने पुन्हा शुटिंगला सुरुवात केली होती. आता प्रियांका चोप्राने शूटमधील तिच्या दुखापतीचा फोटो शेअर केला आहे.

प्रियंका चोप्राने सेअर केला जखमी चेहऱ्याचा फोटो

परदेशी प्रोजेक्ट 'सिटाडेल'च्या शूटचा हा फोटो शेअर करत अभिनेत्रीने लिहिले की, 'तुम्हालाही काम करताना कठीण दिवसांचा सामना करावा लागला आहे?' आणि त्यानंतर तिने कॅप्शनमध्ये हसतानचा इमोजी टाकला आहे. हा फोटो तिच्या जखमी मेकअपचा आहे.

प्रियांका चोप्रा अनेक दिवसांपासून या प्रोजेक्टवर काम करत आहे. याआधीही प्रियांकाने सिटाडेलशी संबंधित फोटो शेअर केले होते. सिटाडेल या वेब सिरीजमध्ये प्रियंकासोबत रिचर्ड मॅडेन आणि पेड्रो लिएंड्रो दिसणार आहेत. सिटाडेलमध्ये प्रियांका चोप्रा एका गुप्तहेराची भूमिका साकारत आहे.

या मालिकेसाठी अभिनेत्रीने गेल्या काही महिन्यांपासून लंडनमध्ये शूटिंग केले होते. यापूर्वी त्याने टेक्स्ट फॉर यू या आंतरराष्ट्रीय चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले होते. सिटाडेल मालिका अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. याद्वारे अभिनेत्री प्रियंकाचे वेब सीरिजमध्ये पदार्पण होणार आहे.

'अव्हेंजर्स: एंडगेम'चे द रुसो ब्रदर्स हे या सिटाडेल मालिकेचे कार्यकारी निर्माते आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की प्रियांका चोप्रा 'वी कॅन बी हीरोज' या हॉलिवूड चित्रपटात दिसली होती, प्रियांकाच्या तिच्या आगामी चित्रपटांमध्ये 'सिटाडेल' तसेच 'जी ले जरा' आणि 'मॅट्रिक्स 4' यांचा समावेश आहे.

हेही वाचा -कान्स 2022 मध्ये सब्यसाचीच्या पोशाखात अवतरली दीपिका पदुकोण

ABOUT THE AUTHOR

...view details