दोन जागतिक किर्तीच्या सौंदर्यवती महिलांनी लग्न केले असल्याचे उघड झाले आहे. 2020 मध्ये मिस अर्जेंटिना बनलेली मारियाना वरेला आणि मिस प्वेर्तो रिको जिंकणाऱ्या फॅबिओला व्हॅलेंटिन यांनी उघड केले की त्यांनी दोन वर्षे गुप्तपणे डेटिंग केल्यानंतर लग्न केले आहे.
2020 मध्ये मिस ग्रँड इंटरनॅशनल (MGI) मध्ये दोघे भेटले आणि स्पर्धा संपल्यानंतर संपर्कात राहून मैत्री झाली. या मैत्रीचे रुपांत एकमेकांच्या प्रेमात झाले. गेली दोन वर्षे त्यांनी आपल्या भेटीगाठी व प्रेम जगापासून लपवले होते. 30 ऑक्टोबर रोजी त्यांनी त्यांच्या लग्नाची घोषणा सोशल मीडियावरुन केल्यानंतर दोघींच्याही चाहत्यांना धक्का बसला आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी असे सुचवले आहे की वेरेला आणि व्हॅलेंटीन यांनी 28 ऑक्टोबर रोजी लग्न केले होते.
“आमचे नाते खासगी ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर, आम्ही एका खास दिवसासाठी आमचे दरवाजे उघडले. 28/10/22,” असे त्यांनी लिहिल्याचे एका मॅगझिनने म्हटले आहे.