लॉस एंजेलिस (यूएस) - सध्या हॉलिवूडमध्ये सुरू असलेल्या लेखकांच्या संपामुळे तमाम शुटिंग अडचणीत आली आहेत. याचा थेट परिणाम मार्वलच्या आगामी प्रोजेक्ट, व्हॅम्पायर थ्रिलर ब्लेडच्या शूटवर झाला आहे. हॉलिवूडमधील बातम्यांनुसार निर्मात्यांनी महेरशाला अली याची भूमिका असलेल्या व्हॅम्पायर थ्रिलरचे प्रीप्रॉडक्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रोजेक्टचे शुटिंग पुढील महिन्यात अटलांटा येथे सुरू होणार होते.
लेखकांच्या संपामुळे हॉलिवूड ठप्प - स्क्रिप्टवर काम करण्यासाठी ब्लेडने अलीकडेच ट्रू डिटेक्टिव्ह निर्माते निक पिझोलाट्टोला नियुक्त केले होते. मात्र, संप सुरू झाल्यानंतर त्यांचेही काम ठप्प झाले. लेखकांच्या संपाच्या सर्वात मोठा परिणाम रात्रीचे टॉक शो आणि सॅटरडे नाईट लाइव्हवर झाला आहे. शोटाईम्स बिलियन्स या नाट्यमय मालिकेने या संपामुळे आपी नर्मिती थांबवली आहे. काही स्टुडिओमध्ये एक किंवा दोन चित्रपट तयार होत असताना, मार्व्हल एकाच वेळी तीन चित्रपटांच्या शूटिंगला चालना देत होते. न्यू वर्ल्ड ऑर्डर सध्या अटलांटामध्ये शुटिंग करत आहे. टीव्ही शो अगाथा: कोव्हन ऑफ केओसचे देखील अटलांटा येथे शूटिंग सुरू आहे, तर सहकारी मालिका वंडर मॅन लॉस एंजेलिसमध्ये शूट करत आहे. डेडपूल 3 या महिन्याच्या शेवटी लंडनमध्ये शूट सुरू करण्याची शक्यता आहे, तर थंडरबोल्ट्स जूनमध्ये अटलांटाला धडकणार आहेत.