महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

पाहा, फुल्ल 'मूड'मधील मलायकाचा रिलॅक्स फोटो - Malaika Arora photos

मलायका अरोराने एक फोटो शेअर करून ती फुल मूडमध्ये असल्याचे सांगितले आहे. या फोटोवर तिचे चाहते आणि बॉलिवूड सेलिब्रिटी भरपूर कमेंट करत आहेत.

मलायकाचा रिलॅक्स फोटो
मलायकाचा रिलॅक्स फोटो

By

Published : Mar 31, 2022, 9:56 PM IST

मुंबई- फिटनेस फ्रीक आणि डान्सिंग क्वीन मलायका अरोरा हिचे फिल्मी दुनियेत स्वतःचे वेगळे स्थान आहे. मलायका ही एकमेव अशी सेलिब्रिटी आहे जिला प्रसिद्धीसाठी कोणत्याही चित्रपटाची किंवा गाण्याची गरज नाही. मलायका जिथेही दिसेल तिथे तिला आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी चाहत्यांसह होशी फोटोग्राफर्सची गर्दी होते. याशिवाय मलायकाचे दुसरे घर सोशल मीडिया आहे, जिथे तिने तिच्या आयुष्याची सर्व पाने उघडी ठेवली आहेत. आता या फोटोत बघा मलायका फुल्ल 'मूड'मध्ये आली आहे आणि त्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

फुल्ल मूडमध्ये आहे मलायका

फुल्ल मूडमध्ये आहे मलायका- मलायका अरोराने गुरुवारी इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या एका फोटोने इन्स्टा वॉलला हॉट केले आहे. हा फोटो शेअर करत मलायकाने लिहिले, 'मूड'. मलायका खरोखरच मूडमध्ये दिसत असल्याचे फोटो पाहिल्यानंतर कळते.

मलायकाच्या फोटोतील लूकबद्दल बोलायचे झाले तर ती एकदम ट्रेंडी दिसत आहे. पांढरा स्लीव्हलेस टॉप, पीच कलरचा शॉर्ट्स बीन कलरचा झिपर घातला आहे. मलायकाने पायात ट्रेंडी कॅज्युअल शूज घातले आहेत. लूक रिच करण्यासाठी गळ्यात गडद कॉपर कलरची चेन तिने घातली आहे. मलायकाने आपले केस मागे बांधून पोनीटेल बनवले आहे. मलायकाचा ऑल टाइम ट्रेंडी लूक मुलींसाठी फॅशन गोल सेट करत आहे.

फॅन्स आणि सेलिब्रिटींच्या कमेंट्स- चाहत्यांसह बॉलिवूड सेलेब्सही या फोटोवर कमेंट करत आहेत. मलायकाची मैत्रीण आणि बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरने या फोटोवर कमेंट करत लिहिले, 'बिग मूड'. मलायकाची धाकटी बहीण आणि अभिनेत्री अमृता अरोरा लिहिते, 'अब किसलीए क्वीन'. त्याचबरोबर मलायकाचे चाहते तिच्या या फोटोवर हॉटी, गॉर्जियस आणि ब्युटीफुल अशा कमेंट करत आहेत.

हेही वाचा -पाहा, कॅटरिना विकीचे अज्ञात ठिकाणावरील हॉलिडे फोटो

ABOUT THE AUTHOR

...view details