महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'कच्चा बदाम' गाण्यावर रितेश सोबत माधुरी दीक्षितचे जबरदस्त ठुमके - पाहा व्हिडिओ - रितेशसोबत माधुरी दीक्षितचे जबरदस्त ठुमके

अभिनेता रितेश देशमुखसोबत माधुरी दीक्षितने कच्चा बदाम या व्हायरल गाण्यावर जोरदार डान्स केला आहे. तिचा हा व्हिडिओ सोसल मीडियावर व्हायरल झाला आहे.

माधुरी दीक्षितचे जबरदस्त ठुमके
माधुरी दीक्षितचे जबरदस्त ठुमके

By

Published : Mar 31, 2022, 12:48 PM IST

Updated : Mar 31, 2022, 12:59 PM IST

मुंबई -सोशल मीडियावर खळबळ माजवणाऱ्या 'कच्चा बदाम' या व्हायरल गाण्याचे भूत अद्याप लोकांच्या डोक्यातून उतरलेले नाही. गायक भुबन बड्याकरच्या 'कच्चा बदम' या गाण्याचे रील्स बनवून केवळ देशातच नाही तर परदेशातही सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहे.

या व्हायरल गाण्यावर बॉलिवूडकरसुद्धा स्वतःला डान्स करण्यापासून रोखू शकले नाही. आता बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितने कच्चा बदाम या व्हायरल गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. कच्चा बदामवर माधुरी दीक्षितने एकटीने नाही तर अभिनेता रितेशनेही तिला डान्समध्ये साथ दिली आहे.

माधुरी दीक्षितने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर रितेश देशमुखसोबत कच्चा बदामवर डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये माधुरीने सिल्व्हर कलरचा लेहेंगा घातला आहे. त्याचबरोबर रितेशने काळ्या रंगाचा सूट घातला आहे. 'कच्चा बदाम' या व्हायरल गाण्यावर माधुरी आणि रितेश तालावर ठेका धरताना दिसत आहेत. गाण्याच्या अखेरीस माधुरी कंबर लचकवत रितेशला जोरदार धक्का देते आणि मिश्किल हसताना दिसते.

हा व्हिडिओ शेअर करत माधुरीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हे खूप मजेदार होते, होय ना रितेश देशमुख? रितेश माझ्यासोबत सामील झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद? रितेशने कमेंटमध्ये लिहिले की, 'खरंच खूप मजा आली, माझ्यासाठी नेहमीच सौभ्याग्याचा विषय असेल'.

माधुरी दीक्षितच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अलीकडेच अभिनेत्रीने 'द गेम ऑफ फेम' या ओटीटी मालिकेतून पदार्पण केले आहे. माधुरीने या मालिकेत यशस्वी अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे. एका सुपरस्टारला आयुष्यात कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो हे या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे.

हेही वाचा -Madhuri Dixit New Rented home : माधुरी दिक्षीतने वरळीत घेतले नवीन घर; भाडे ऐकून व्हाल थक्क

Last Updated : Mar 31, 2022, 12:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details