मुंबई बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा चित्रपटाला सोशल मीडियावर अकादमीकडून समर्थन मिळाले. अकादमीच्या अधिकृत हँडल्सने शनिवारी फॉरेस्ट गंप आणि लाल सिंग चड्ढा यांचा व्हिडिओ कोलाज शेअर केला आहे. सोशल मीडियाच्या एका समुहाने अकादमीवर आमिरची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटासाठी पीआर एजन्सीप्रमाणे काम केल्याचा आरोप केल्यामुळे या निर्णयाला नेटिझन्सकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. लाल सिंग चड्ढा हा चित्रपट फॉरेस्ट गंप हॉलिवूड चित्रपटाचे अधिकृत हिंदी रूपांतर आहे.
अकादमीने सोशल मीडियावर भारतीय रूपांतराने ऑस्कर विजेत्या मूळ चित्रपटाची जादू कशी पुन्हा निर्माण केली आहे याचे एक आश्चर्यकारक संकलन शेअर केले आहे. जग बदलू पाहणाऱ्या एका निरागस माणसाची गोष्ट रॉबर्ट झेमेकिस या दिग्दर्शकाने ऑस्कर पुरस्कार विजेत्या फॉरेस्ट गंप या चित्रपटातून केली होती. एरिक रॉथ यांनी या चित्रपटाची कथा लिहिली होती व टॉम हँक्सने यात मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे हिंदी रुपांतर दिग्दर्शक अद्वैत चंदनने केले तर याची कथा अतुल कुलकर्णीने लिहिली. या चित्रपटात आमिर खानने निरागस लाल सिंग चड्ढा साकारला आहे. याबद्दल अकादमीने आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये गौरवाने लिहिले आहे.