मुंबई- प्रसिद्ध पॉप सिंगर जस्टिन बीबर रोजच चर्चेत असतो. कधी त्याच्या कामाबद्दल तर कधी रिलेशनशिप स्टेटसबद्दल. आता जस्टिन बीबर चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्याची पत्नी हेली बीबर आणि एक्स गर्लफ्रेंड सेलेना गोमेझ. वास्तविक, जस्टिनची पत्नी आणि एक्स गर्लफ्रेंड एका पार्टीत एकत्र दिसले होते. इतकंच नाही तर दोघींनी एकत्र पोजही दिल्या. हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
कुठे झाली भेट? - अलीकडेच सेलेना आणि हेलीला स्टार्स अकादमी म्युझियम गालामध्ये एकत्र स्पॉट करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अनेक हॉलिवूड स्टार्स उपस्थित होते. मात्र कार्यक्रमातील लोकांचे सर्वाधिक लक्ष सेलेना आणि हॅलीच्या भेटीकडे गेले. या संपूर्ण कार्यक्रमात फक्त या सुंदर मुलींचीच चर्चा होत होती. एवढेच नाही तर सेलेना आणि हेलीने या कार्यक्रमात एकत्र जोरदार पोज दिल्या. हे फोटो प्रसिद्ध फोटोग्राफर टायरेल हॅम्प्टनने क्लिक केले आहेत, ज्यासाठी तो खूप चर्चेत आहे.
हेली बीबर आणि सेलेना गोमेझ सोशल मीडियावर व्हायरल फोटो - सोशल मीडियावर हे फोटो आगीसारखे पसरत आहेत. सेलेना आणि हॅलीच्या भेटीने सर्वांनाच धक्का बसला आहे. अशा परिस्थितीत काही यूजर्स असे आहेत ज्यांना या फोटोंवर विश्वास बसत नाही. फोटोंमध्ये दोन्ही सुंदर मुली हसताना दिसत आहेत. सेलेनाने काळ्या रंगाचा सूट घातला आहे, तर हॅलीने कट-आउट सेंट लॉरेंट गाऊन परिधान केला आहे. फोटो शेअर करताना एका यूजरने लिहिले की, सेलेना आणि हेलीचे हे चित्र इतिहासाच्या पुस्तकांसाठी बनवले आहे.
जस्टिन-सेलेना कधी केले डेटिंग - सेलेना आणि पॉप सिंगर जस्टिन बीबर यांनी 2010 ते 2018 या काळात एकमेकांना डेट केले होते. यादरम्यान दोघांमध्ये मतभेद झाले आणि ब्रेकअपही झाले, मात्र काही काळानंतर दोघेही एकत्र दिसले. 2018 मध्ये दोघांचे ब्रेकअप झाल्यानंतर जस्टिनने हेलीसोबत लग्न केले.
हेही वाचा -अभिनय बेर्डे आणि तेजस्वीचा रोमँटिक 'मन कस्तुरी रे'च्या ट्रेलरने जिंकले प्रेक्षकांची मने