लॉस एंजलिस (अमेरिका) :दरवर्षीप्रमाणेच ग्रॅमी पुरस्कारावर भारतीयांनी आपली छाप पाडली आहे. न्यूयॉर्कस्थित भारतीय-अमेरिकन गायिका फाल्गुनी शाह (Falguni Shah) हिला 'अ कलरफुल वर्ल्ड'साठी तर रिकी केज (Ricky Kej ) यांना त्यांच्या ‘डिव्हाइन टाइड’ या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. याबद्दल त्या दोघांवरकौतुकाचा वर्षाव होत आहे. पुरस्कार स्विकारताना स्टेजवर रिकीने भारतीय पध्दतीने नमस्कार केल्याने त्यांच्या या कृतीचे नेटकरी कौतुक करत आहेत.
कोण आहे फाल्गुनी शाह
फाल्गुनी शाह ही अमेरिकन भारतीय गायिका आहे. तिला सर्वोत्कृष्ट मुलांच्या अल्बम प्रकारातील ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. फाल्गुनीने ग्रॅमी-आयोजक रेकॉर्डिंग अकादमीचे सोशल मिडीयावरून आभार मानले. “आजच्या दिवसाचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. 'ग्रॅमी प्रीमियर सेरेमनी'मध्ये परफॉर्म करणे आणि त्यानंतर 'अ कलरफुल वर्ल्ड' या अल्बमसाठी पुरस्कार प्राप्त करणे हा माझा सन्मान आहे. याबद्दल आकादमीचे आभार.' अशा शब्दात तिने भावना व्यक्त केल्या आहेत.