महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

सुपरहिरो चित्रपट 'हनुमान'चा ट्रेलर लॉन्च, पॅन इंडियासह जगभरातील भाषांमध्ये होणार रिलीज - प्रशांत वर्मा यांनी दिग्दर्शित हनुमान

आगामी सुपरहिरो चित्रपट हनुमानचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. तेजा सज्जानं साकारलेला हा सुपरहिरो चित्रपट प्रशांत वर्माने दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट एका तरुण मुलाच्या परिवर्तनाची कथा आहे जेव्हा तो वाईटाशी लढा देत भगवान हनुमानाकडून महासत्ता मिळवतो.

HanuMan trailer
हनुमानचा ट्रेलर लॉन्च

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 19, 2023, 5:27 PM IST

मुंबई - हनुमान चित्रपटाच्या निर्मात्यांनी 19 डिसेंबर रोजी आगामी सुपरहिरो चित्रपटाच्या ट्रेलरचे लॉन्चिंग केले. अभिनेता तेजा सज्जा या चित्रपटामध्ये हनुमानाची व्यक्तीरेखा साकारत आहे. आता हनुमान चित्रपटाचा ट्रेलर रुपेरी पडद्यावर काल्पनिक आणि पौराणिक कथांचा सुरेख मिलाफ आणण्यासाठी सज्ज झाला आहे. हनुमान चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तरुण भगवान हनुमानाने बहाल केलेल्या अलौकिक क्षमता असलेल्या अंजनाद्रीच्या एका काल्पनिक गावातील एका गूढ जगाची ओळख करून दिली जाते.

साडेतीन मिनिटांच्या हनुमान ट्रेलरमध्ये एका सामान्य व्यक्तीच्या प्रवासाची झलक दिसते. या कथानकातून हनुमान हा एक पॅन-इंडियन सुपरहिरो म्हणून उदयास आला आहे. यामध्ये भगवान हनुमानाच्या दैवी पराक्रमाद्वारे सुपरहिरोमध्ये रूपांतरित झालेल्या मुलाच्या कथेचे वर्णन पाहायला मिळणार आहे.

प्रशांत वर्मा यांनी दिग्दर्शित आणि लेखन केलेल्या या चित्रपटात अमृता अय्यर, वरलक्ष्मी सरथकुमार, राज दीपक शेट्टी आणि विनय राय यांच्यासह अनेक कलाकार आहेत. हनुमान हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम यांसारख्या अनेक भारतीय भाषांमध्ये रिलीज होईल. त्यासोबतच इंग्रजी, स्पॅनिश, कोरियन, चायनीज आणि जपानी या भाषामध्ये आंतरराष्ट्रीय स्तारावरही रिलीज होणार आहे. हनुमान हा प्रशांत वर्मा सिनेमॅटिक युनिव्हर्सचा पहिला चित्रपट आहे.

हनुमान ट्रेलर रिलीज होण्यापूर्वी, चित्रपटाच्या रिलीज झालेल्या ट्रॅक – हनुमान चालिसा, सुपरहिरो हनुमान आणि अवकाया यांना प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. हनुमान हा चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. रामायणातील हनुमानाची व्यक्तीरेखा खूप प्रामाणिक, साहसी अशी आहे. त्यामुळे आजवर झालेल्या अनेक टीव्ही मालिका, पौराणिक चित्रपट यातून हे पात्र अबालवृद्धांचं आवडतं दैवत ठरलं आहे. आता ही कथा सुपरहिरोच्या स्वरुपात येणार असल्यामुळे ती एक वेगळ पर्वणी असेल.

हेही वाचा -

  1. 'डंकी'च्या हार्ड हिटिंग डायलॉगवर चाहते झाले फिदा
  2. 'फायटर'च्या शूटिंग सेटवरील हृतिक रोशनचा व्हिडिओ व्हायरल ; पाहा व्हिडिओ
  3. मुनावर फारुकी 'बाईलवेडा' असल्याचा एक्स गर्लफ्रेंड नाझिला सिताशीने केला आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details