महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

हॉलिवूड अभिनेता रे लिओटा यांचे शूटिंगदरम्यान निधन - रे लिओटा यांचेा झोपेत मजत्यू

डेंजरस वॉटर्स या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हॉलिवूड अभिनेता रे लिओटा यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले. डोमिनिकन रिपब्लिकमध्ये त्यांचा झोपेत मृत्यू झाला.

अभिनेता रे लिओटा
अभिनेता रे लिओटा

By

Published : May 27, 2022, 12:35 PM IST

वॉशिंग्टन- प्रसिद्ध दिग्दर्शक मार्टिन स्कॉर्सेसच्या ''गुडफेलास''मध्ये मॉब स्निच हेन्री हिलच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता रे लिओटा यांचे निधन झाले. 67 वर्षीय लिओटा यांच्या मागे एक मुलगी, कारसेन आहे. डोमिनिकन रिपब्लिकमध्ये त्यांचा झोपेत मृत्यू झाला, या ठिकाणी रे लिओटा ''डेंजरस वॉटर्स'' चित्रपटाचे शूटिंग करत होते.

हॉलिवूड रिपोर्टरच्या मते, जोनाथन डेम्मेच्या ''समथिंग वाइल्ड''मध्ये आणि 2016-18 NBC कॉप ड्रामा ''शेड्स ऑफ ब्लू'' मधील कॉप मॅट वोझ्नियाकच्या भूमिकेत अभिनेता रे लिओटा संस्मरणीय ठरले.

''गुडफेलास''मधील सहकलाकार असलेल्या लॉरेन ब्रॅकोने त्यांना श्रद्धांजली वाहिली. तिने ट्विटरवर लिहिले, “माझ्या रेबद्दलची ही भयानक बातमी ऐकून मी पूर्णपणे हादरले आहे." तिने पुढे लिहिलंय, ''मी जगात कुठेही असले तरी लोक मला विचारतात की तिचा आवडता चित्रपट कोणता तर मी सांगते ''गुडफेलास''. मग ते नेहमी विचारतात की चित्रपट बनवण्याचा सर्वोत्तम भाग कोणता होता. यावर माझा प्रतिसाद नेहमीच सारखाच असतो... रे लिओट्टा."

रेमंड अॅलन लिओटा यांचा जन्म 18 डिसेंबर 1954 रोजी नेवार्क शहरात झाला. तो सहा महिन्यांचा असताना त्याला अनाथाश्रमातून दत्तक घेण्यात आले होते.

हेही वाचा -करण जोहरच्या बर्थडे बॅशमध्ये शाहरुख खानची जबरा एन्ट्री, डान्स व्हिडिओ व्हायरल

ABOUT THE AUTHOR

...view details