मुंबई :'गदर २' आणि 'ओ माय गॉड २' हे चित्रपट ऑगस्ट २०२३मधील सर्वात लोकप्रिय चित्रपट आहेत. शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर हे चित्रपट धमाकेदार कमाई करण्यासाठी सज्ज आहेत. अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर २', देशभरात ३५००हून अधिक स्क्रीन्सवर प्रदर्शित होणार आहे. 'गदर २'चे दोन आठवड्यांपूर्वी खूप जोरदार प्रमोशन झाले आहे. याशिवाय दोन आठवड्यांपूर्वीच या चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग उघडण्यात आला होती. दुसरीकडे, 'ओ माय गॉड २' हा चित्रपट, देशभरात १५०० पेक्षा जास्त स्क्रीनवर प्रदर्शित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ११ ऑगस्टला 'गदर २' आणि 'ओ माय गॉड २' हे दोन्ही सीक्वेल चांगलेच बॉक्स ऑफिसवर भिडणार आहे. हे दोन्ही चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक खूप आतुर आहे.
'ओ माय गॉड २' आणि गदर २ : 'ओ माय गॉड २' या चित्रपटाला याआधी खूप वादाचा सामाना करावा लागला होता. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डच्या कडक कारवाईच्या प्रक्रियेतून जावे लागले होते. २ तास ३६ मिनिटांच्या रनटाइमसह या चित्रपटाला 'अ' प्रमाणपत्र मिळाले. 'गदर २' आणि 'ओ माय गॉड २' या दोन्ही चित्रपटाला प्री-बुकिंगमध्ये प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान ९ ऑगस्ट रोजी रात्री ९ पर्यंतचे शो पूर्ण , गदर २चे बुक झाले आहेत. या चित्रपटाच्या सुमारे ३५५,००० तिकिटे विकल्या गेली आहेत. या चित्रपटाने रिलीजपूर्वीच जवळपास ९ कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिस जबरदस्त कमाई करेल असे सध्या दिसत आहे. 'गदर २' बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करेल असे अनेक कलाकार देखील म्हणत आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगनाने देखील या चित्रपटाबद्दल सकारात्मक बाजू मांडत चित्रपटाचे कौतुक केले आहे.