मुंबई - असे नेहमी म्हटलं जातं की चित्रपटजगतात अनादी काळापासून स्त्रियांचे शोषण होत आले आहे. अगदी हॉलिवूडमध्येसुद्धा हेच चित्र दिसून येतं. अनेक निर्माते, दिग्दर्शक, मोठे स्टार्स काही सुंदर मुलींचा, अभिनेत्रींचा ‘वापर’ करीत असतात. हॉलिवूडमध्ये काही प्रसिद्ध अभिनेत्रींनी तेथील प्रसिद्ध निर्माता हार्वे वाइंस्टेनवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. तेथील न्यायालयांनी त्या निर्मात्याला दोषी ठरवून जेलमध्ये टाकले. त्याच्याकडे नावाजलेले वकील असूनही त्याला शिक्षा भोगावीच लागते आहे. २०१८ साली हे सुरु झालं तेव्हा त्याला #MeToo मुव्हमेंट म्हणून संबोधिले जाऊ लागले. आपल्याकडेही त्या संदर्भातील काही प्रकरणं बाहेर आली. परंतु काही दिवसांनी त्याचा प्रभाव फिका पडला आणि बॉलिवूडमध्ये पूर्वीप्रमाणे सर्वकाही सुरु राहिलं आहे.
नव्वदीच्या सुरुवातीला सोमी अली नावाची पाकिस्तानी-अमेरिकन अभिनेत्री बॉलिवूडमध्ये दाखल झाली. षोडशा सोमी अली ‘मैने प्यार किया’ बघितल्यानंतर सलमान खानवर फिदा झाली होती आणि त्याच्यासोबत लग्न करायचं म्हणून थेट अमेरिकेतून मुंबईत पोहोचली होती. सलमान सुद्धा नुकताच स्टार झाला होता आणि त्या दोघांचे प्रेमप्रकरण सुरु झाले. तिचे त्याच्या घरी येणेजाणे असे आणि ती त्याच्या पालकांनाही सून म्हणून पसंत होती असे बोलले जाते. सोमीने काही चित्रपट केले त्यातील बरेचशे आपटले. परंतु तिला सलमान सोबत लग्न करून संसार थाटायचा होता. आठेक वर्षे रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर तिने अचानकपणे सलमान बरोबरचे संबंध तोडले आणि अमेरिकेला निघून गेली. ‘झूम’ ला दिलेल्या मुलाखतीत सोमीने सांगितले की सलमानने तिला ‘चिट’ केले, धोका दिला आणि त्यामुळे तिने त्याच्याशी संबंध तोडले. तसेच त्या दोघांची नंतर कधीही भेट झाली नाही.
पूर्वाश्रमीची गर्लफ्रेंड सोमी अलीची सलमान खानला धमकी? - Somi Ali Salman Khan love affair
एकेकाळी सलमानसाठी आपला देश सोडून बारतात आलेली अभिनेत्री सोमी अली काही काळ सलमानसोबत लग्नाचे स्वप्नं पाहात होती. आठेक वर्षे रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर तिने अचानकपणे सलमान बरोबरचे संबंध तोडले आणि अमेरिकेला निघून गेली. ‘झूम’ ला दिलेल्या मुलाखतीत सोमीने सांगितले की सलमानने तिला ‘चिट’ केले, धोका दिला आणि त्यामुळे तिने त्याच्याशी संबंध तोडले. तसेच त्या दोघांची नंतर कधीही भेट झाली नाही.

सोमी अलीची सलमान खानला धमकी