महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Cannes 2023 : अभिनेत्री सारा अली खानसह मानुषी छिल्लर कान्स 2023 साठी रवाना

अभिनेत्री सारा अली खान आणि मानुषी छिल्लर 2023 सालच्या कान महोत्सवाच्या रेड कार्पेटवर पदार्पण करण्यासाठी सज्ज आहेत. या दोन्ही कलाकारांना सोमवारी रात्री मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले होते. कान्समध्ये पदार्पण करणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्रींच्या यादीत अनुष्का शर्माचाही समावेश आहे.

सारा अली खानसह मानुषी छिल्लर
सारा अली खानसह मानुषी छिल्लर

By

Published : May 16, 2023, 12:30 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान यंदाच्या प्रतिष्ठित कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर चालणार आहे. सारा पतौडी या वर्षी कान्समध्ये पदार्पण करणार आहेत आणि माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरही. दोघीही फ्रान्सला रवाना होत असताना मुंबई विमानतळावर त्यांचे दर्शन पापाराझींना झाले.

फ्रेंच रिव्हिएरासाठी भारतीय सेलेब्रिटी रवाना- विजय वर्मा आणि उर्वशी रौतेला आधीच फ्रेंच रिव्हिएरा येथे पोहोचले आहेत, तर सारा अली खान आणि मानुषी छिल्लर सोमवारी रात्री मुंबई विमानतळावर दिसले. दोघीही 76 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी रवाना झाल्या. हा प्रतिष्ठीत महोत्सव 16 मे सुरू होणार आहे आणि 27 मे पर्यंत चालेल. दोन्ही अभिनेत्रींनी कॅज्युअल एअरपोर्ट लूकची निवड केली होती. रेड कार्पेटवर चालणे बहुतेक कलाकारांसाठी त्यांच्या करियरच्या भरभराटीचे लक्षण वाटत असते.

सारा आणि मानुषीचा एअरपोर्ट लूक - साराने काळ्या रंगाचे जाकीट आणि स्कीनी डेनिम निवडले होते. या ड्रेसमध्ये तिने विमानतळावर एक स्टाइलिश फॅशनचे प्रदर्शन केले. तर दुसरीकडे, मानुषी एका पांढऱ्या टँक टॉपमध्ये दिसली होती जी तिने थाय हाय जीन्ससह जोडली होती. तिने तिचा एअरपोर्ट लुक जॅझ करण्यासाठी गुडघ्यापर्यंत उंच बूट घातले होते.

कान्समध्ये सहभागी होणारे भारतीय सेलेब्रिटी- दरम्यान, सारा आणि मानुषी यांच्या शिवाय अनुष्का शर्माही यावर्षी कान्समध्ये पदार्पण करणार आहे. ऑस्कर पुरस्कार विजेते भारतीय चित्रपट निर्माते गुनीत मोंगा, अभिनेत्री ईशा गुप्ता, कंगाबम टोंबा आणि सोशल मीडिया इन्फ्लुअन्सर डॉली सिंग कान चित्रपट महोत्सवात सहभागी होणार आहेत. दिग्गज अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन देखील यावर्षी चित्रपट महोत्सवात परतणार आहे. फॅशनच्या जगातात कान्स फिल्म फेस्टीव्हलला खूप महत्त्व आहे. जगभरातील फॅशन डिझायनर्स आपल्या कौशल्याचे प्रदर्शन कान्समध्ये करत असतात. यासाठी जगभरातून सौंदर्यवती सेलेब्रिटी नवनव्या पोषाखात कान्सच्या रेड कार्पेटवर उतरतात आणि सौंदर्यासह फॅशनचा जलवा जगाला दाखवतात. ही सेलेब्रिटींसाठी एक पर्वणी असते.

हेही वाचा -Amitabhs journey on a bike : ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या अमिताभ यांनी चक्क बाईकवरुन गाठला स्टुडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details